देशात झूम, टीकटॉसह 52 चायना अ‍ॅप ब्लॉक करा, गुप्तचर यंत्रणांची सरकारला सूचना

By ऑनलाइन लोकमत | Published: June 18, 2020 12:17 PM2020-06-18T12:17:06+5:302020-06-18T12:17:56+5:30

भारतीय सीमेवरील गलवान खोऱ्यात चीनने सोमवारी रात्री केलेल्या हल्ल्याला भारताने दिलेल्या चोख प्रत्युत्तरात ३५ चिनी सैनिक गंभीर जखमी किंवा मृत झाले असल्याची माहिती अमेरिकी गुप्तचर यंत्रणच्या हवाल्याने देण्यात आली आहे.

Block these 52 China Ps in the country, intelligence agencies inform the government | देशात झूम, टीकटॉसह 52 चायना अ‍ॅप ब्लॉक करा, गुप्तचर यंत्रणांची सरकारला सूचना

देशात झूम, टीकटॉसह 52 चायना अ‍ॅप ब्लॉक करा, गुप्तचर यंत्रणांची सरकारला सूचना

Next

नवी दिल्ली - भारतीय गुप्तचर यंत्रणांनी केंद्र सरकारकडे चीनच्या 52 मोबाईल एप्लिकेशनची यादी सोपवली आहे. त्यामध्ये, टीकटॉक, झूम अॅपसह डिजिटल मीडियात फेमस असलेल्या इतरही अॅप्सचा समावेश आहे. एजन्सीने संकलित केलेल्या या 52 अॅप्सचा चीनशी संबंध असून चीनची गुंतवणूक या मोबाईल अॅपच्या बिझनेसमध्ये आहे. भारतीय गुप्तचर यंत्रणांनी केंद्र सरकारला 52 चायनिज अॅपची यादी देत हे अॅप ब्लॉक करण्याचे सूचवले आहे. तसेच, नागरिकांनाही मोबाईलमधून हे अॅप्स अनइन्स्टॉल करण्याचं आवाहन करण्याचंही यंत्रणांनी म्हटलंय. 

भारतीय सीमेवरील गलवान खोऱ्यात चीनने सोमवारी रात्री केलेल्या हल्ल्याला भारताने दिलेल्या चोख प्रत्युत्तरात ३५ चिनी सैनिक गंभीर जखमी किंवा मृत झाले असल्याची माहिती अमेरिकी गुप्तचर यंत्रणच्या हवाल्याने देण्यात आली आहे. भारत व चिनी सैनिकांमध्ये सोमवारी रात्री झालेल्या संघर्षात भारताचे एका कर्नलसह २० जवान शहीद झाले होते. गेल्या पाच दशकांमध्ये दोन्ही देशांच्या सैनिकांमध्ये इतकी मोठी चकमक पहिल्यांदाच घडली आहे. त्यामुळे, भारतीय सीमारेषेवर तणाव असून देशातील नागरिकांमध्ये चीनबद्दल प्रचंड संताप आहे. त्याच पार्श्वभूमीवर चीनी मालावर बहिष्कार घालण्याचं आवाहन आणि आंदोलन नागरिकांकडून करण्यात येत आहे. आता, भारतीय गुप्तचर यंत्रणांनीही 52 चीनी अॅप्सची यादीच केंद्र सरकारला सोपवली आहे. 

इंटेलिजन्स एजन्सीने केंद्राकडे सोपवलेल्या यादीत व्हिडिओ कॉन्फरेन्सिंग झूम, सोशल मीडियावरील फेमक टिकटॉक अॅप्ससह इतरही प्रसिद्ध अॅप्सचा समावेश आहे. युसी ब्राऊजर, झेंडर, शेअर इट आणि क्लीनमास्टर याही युजर बेस्ड अॅप्सचा समावेश आहे. राष्ट्रीय सुरक्षा परिषद सचिवालयाद्वारे या अॅप्सना भारत सरकारने मान्यता दिली आहे. यासह, गेमिंग अॅप्स, शॉपिंग अॅप्सचाही समावेश या 52 अॅप्सच्या यादीत आहे. 

चीनशी संबंधित या कंपन्या भारतातील डेटा मोठ्या प्रमाणात मिळवत असून ते देशाच्या बाहेर जात आहे. त्यामुळे ही बाब चिंतेची असून गुप्तचर खात्याशी संबंधित असल्याचे गुप्तचर यंत्रणांनी म्हटले आहे. त्यामुळे, या 52 चीनी अॅप्सवर देशात बंदी घालण्याची मागणी गुप्तचर यंत्रणांनीही केली आहे. 
 

Web Title: Block these 52 China Ps in the country, intelligence agencies inform the government

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.