शहरं
Join us  
Trending Stories
1
'ते विधान राहुल गांधींचे नाही, मी परस्परच..."; वकिलाचा यू-टर्न, जिवाला धोका असल्याच्या वक्तव्याबद्दल काय बोलले?
2
'आमचे कोणतेही लष्करी मित्र नाहीत, फक्त भारतीय नौदलाकडे धाडस'; फिलिपिन्सच्या राजदूतांची पाश्चात्य देशांवर टीका
3
Fatehpur Tomb Controversy: ज्यांच्या मकबऱ्यामध्ये मंदिर असल्याचा दावा, ते नवाब अब्दुल समद कोण?
4
RR नं संजूच्या बदल्यात जड्डू अन् ऋतुराजला मागितले! CSK ला ते अजिबात नाही पटलं; ट्रेड डील फिस्कटली
5
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी 'ऑपरेशन सिंदूर' आणि 'स्वदेशी' विषयी जनजागृती करावी - CM देवेंद्र फडणवीस
6
Video: राहुल गांधींची 'मृत' लोकांसोबत 'चाय पे चर्चा', निवडणूक आयोगाने मारल्याचा आरोप...
7
गणेशोत्सवासाठी कोकणवासीयांना खुशखबर! मुंबई-गोवा महामार्गाबाबत धडक कारवाईचे आदेश
8
"हा वादाचा नव्हे, समाजाचा विषय; आरोग्य अन् आस्था..."; CM फडणवीसांचे कबुतरखाना वादावर विधान
9
Trump's Tariff Policy : ट्रम्प यांचा डाव उलटला! टॅरिफमुळे भारत अन् चीन एकत्र आले; अमेरिकेने स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारली?
10
निशिकांत दुबेला भाजपा नेत्यानेच कशी दिली मात?; कॉन्स्टिट्यूशन क्लब निवडणुकीत तोंडावर पाडले
11
Palghar Crime: धक्का लागला म्हणून कुऱ्हाडीने केले वार, लोकांनी झाडाला बांधून आरोपी चोपला
12
चहलला जळवण्यासाठी बिग बॉस विनरसोबत थिरकली धनश्री? व्हायरल व्हिडिओ मागची गोष्ट
13
"आम्हाला नाही माहीत, पाकिस्तानला...!"; ऑपरेशन सिंदूर दरम्यान एफ-१६ लढाऊ विमान पाडलं गेलं? अमेरिकेनं दिलं असं उत्तर
14
सावरकरांवरील विधानांमुळे माझ्या जीवितास धोका, राहुल गांधींचा दावा, महात्मा गांधींचा उल्लेख करत म्हणाले... 
15
Kabutar Khana: 'तुम्ही असा आदेश कसा काढू शकता?', उच्च न्यायालयाने मुंबई महापालिकेला झापले; काय घडलं?
16
दोन नाही, युट्यूबर अरमान मलिकच्या चार पत्नी; कोर्टाने पाठवले समन्स; धक्कादायक कारण आले समोर
17
भारताचं नागरिकत्व घेण्यापूर्वीच मतदार यादीत नोंदवलं गेलं होतं सोनिया गांधींचं नाव, भाजपाचा गंभीर आरोप
18
'झपाटलेला'मधील लक्ष्याची आवडी आठवतेय का?, सध्या या मालिकेत करतेय काम
19
"संतोष देशमुखांच्या कार्याने गावाला दिल्लीचा मान"; मस्साजोगच्या सरपंचांना PM मोदींकडून निमंत्रण
20
"Muscles असलेल्या बिपाशाशीच लग्न कर", म्हणणाऱ्या मृणाल ठाकूरला अभिनेत्रीचं चोख उत्तर, म्हणाली- "एक स्त्री..."

मंदीत नोटाबंदी आगीत तेल ओतण्यासारखीच; यशवंत सिन्हांचा मोदी सरकारला घरचा आहेर

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 27, 2017 12:52 IST

सरकारने नोटाबंदीचा घेतलेला निर्णय हा आगीत तेल ओतण्यासारखाच आहे, अशी टीका भाजपा नेते यशवंत सिन्हा केली आहे.

ठळक मुद्दे सरकारने नोटाबंदीचा घेतलेला निर्णय हा आगीत तेल ओतण्यासारखाच आहे, अशी टीका भाजपा नेते यशवंत सिन्हा केली आहे.नोटाबंदीच्या घेतलेल्या निर्णयवार टीका करून यशवंत सिन्हा यांनी मोदी सरकारला घरचा आहेर दिला आहे. यशवंत सिन्हा यांनी त्यांनी केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांच्यावरही हल्लाबोल केला आहे.

नवी दिल्ली-  देशाचा जीडीपी सातत्याने घसरतो आहे. त्यामुळे आर्थिक मंदीसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. जीडीपीची घसरण होत असताना सरकारने नोटाबंदीचा घेतलेला निर्णय हा आगीत तेल ओतण्यासारखाच आहे, अशी टीका भाजपा नेते यशवंत सिन्हा केली आहे. नोटाबंदीच्या घेतलेल्या निर्णयवार टीका करून यशवंत सिन्हा यांनी मोदी सरकारला घरचा आहेर दिला आहे. यावेळी यशवंत सिन्हा यांनी त्यांनी केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांच्यावरही हल्लाबोल केला आहे. इंडियन एक्स्प्रेसने हे वृत्त दिलं आहे.

माजी अर्थमंत्री यशवंत सिन्हा यांनी सध्याच्या आर्थिक मंदीसदृश्य परिस्थितीवरही चिंता व्यक्त केली. आपल्या अर्थमंत्र्यांनी अर्थव्यवस्थेला चौपट करण्याचं काम केलं आहे. यामुद्द्यावर मी बोलायचा ऐवजी जर गप्प बसलो तर राष्ट्रीय कर्तव्य पार पाडण्यात मी अपयशी ठरेल. त्यामुळे आता मला बोलावंच लागेल, असं म्हणत सिन्हा यांनी अरूण जेटलींवर टीका केली आहे. पक्षाविरोधात बोलण्याची हिंमत न करणारे लोक माझ्या या वक्तव्याने दुखावले जातील याची कल्पना असल्याचंही सिन्हा म्हणाले आहेत. अरुण जेटली या सरकारमधील सक्षम मंत्री असल्याचं समजलं जातं. २०१४ मध्ये भाजपा सरकारमध्ये अरुण जेटलींनाच अर्थमंत्रिपद दिलं जाईल, असे बोललं जात होतं. त्यांची पात्रता पाहता त्यांच्याकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अर्थ मंत्रालय, संरक्षण आणि कंपनी व्यवहार मंत्रालयाची जबाबदारी सोपवली होती, असंही ते म्हणाले. अर्थ मंत्रालयाचे काम किती कठिण आहे याची मलाही जाणीव आहे. २४ तास काम करावं लागतं. याचाच अर्थ सुपरमॅन अरुण जेटलींनाही हे काम कठिण वाटलं असेल, असं सिन्हा म्हणाले आहेत. 

कच्चा तेलाच्या वाढत्या किंमती आणि बँकांच्या वाढत्या एनपीएवर यशवंत सिन्हा यांनी चिंता व्यक्त केली आहे. या समस्यांना चांगल्या पद्धतीने हाताळता आल्या असत्या, असंही सिन्हा म्हणाले. खासगी गुंतवणुकीत घट झाली आहे. गेल्या दोन दशकांत इतकी कमी गुंतवणूक कधीच झाली नव्हती. औद्योगिक उत्पादनही खूपच घसरलं आहे. कृषी क्षेत्र संकटात आहे तसंच उत्पादन, रोजगार, सेवा ही क्षेत्रंही संकटात आहेत. निर्यात ठप्प झाली आहे. जवळपास सर्वच क्षेत्रांची हीच परिस्थिती आहे, अशा महत्त्वाच्या मुद्द्यांकडे यशवंत सिन्हा यांनी लक्ष वेधलं आहे. 

नोटाबंदीचा निर्णय हे तर आर्थिक संकट असल्याचं सिद्ध झालं आहे. सरकारकडून नोटाबंदीचा निर्णय खूप चुकीच्या पद्धतीने लागू करण्यात आला. जीएसटीमुळे व्यापाऱ्यांच्या मनात भीती निर्माण झाली आहे. अनेक उद्योग बंद पडले. रोजगार क्षेत्रावर परिणाम झाला. अनेकांनी नोकऱ्या गमावल्या आहेत. आर्थिक विकास दरात त्यामुळे सातत्याने घट होते आहे. जीडीपी 5.7 टक्क्यांवर आला. नोटाबंदीमुळे ही परिस्थिती निर्माण झाली नाही, असं सरकारच्या प्रवक्त्यांकडून सांगितलं जातं. नोटाबंदीने तर या आगीत तेल ओतण्याचं काम केलं आहे, अशी थेट टीका यशवंत सिन्हा यांनी केली आहे.