शहरं
Join us  
Trending Stories
1
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
2
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
3
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
4
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
5
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
6
रेल्वे अपघातांमध्ये विक्रमी घट! 'या' स्वदेशी तंत्रज्ञानामुळे सुरक्षेच्या दृष्टीने मोठं पाऊल
7
बीडमध्ये कोळवाडीजवळ थरार! भरधाव डिझेल टँकरने रस्त्यावर घेतला पेट; प्रवाशांमध्ये दहशत
8
मंगळ ग्रह गायब झाला तर पृथ्वीचं काय होणार? संशोधनातून धक्कादायक माहिती आली समोर  
9
"गुलामाने प्रतिक्रिया द्यायची नसते हे त्यांना सांगा"; अधिवेशनात उद्धव ठाकरेंचा एकनाथ शिंदेंवर घणाघात
10
विरोधी पक्षनेतेपदाबाबत उद्धव ठाकरे आक्रमक, सरकारची कोंडी करण्याची तयारी; स्पष्ट इशाराच दिला
11
“अधिवेशानाचे सत्ताधाऱ्यांना गांभीर्य नाही, ‘हम करे सो कायदा’ पद्धतीने…”: हर्षवर्धन सपकाळ
12
“संसदीय लोकशाहीत विविध पक्षांच्या संघटनेचे योगदान देखील महत्त्वाचे”: मंत्री चंद्रकांत पाटील
13
“बाबा आणि आत्याने आईला खूप मारलं'”; ढसाढसा रडत ४ वर्षांच्या लेकाचा धक्कादायक खुलासा
14
अक्षय खन्नाला आहेत दोन भाऊ, एक सख्खा अन् एक सावत्र, दोघांनीही बॉलिवूडमध्ये केलं काम
15
विराट कोहली, रोहित शर्माला कपिल देव यांचा अजब सल्ला, म्हणाले- "मला वाटतं की टीम इंडियात..."
16
कॅमेरा नसलेला 'आयफोन' बाजारात? खरेच असा फोन अस्तित्वात आहे का? ॲप्पलच बनविते...
17
या ठिकाणी अचानक पडले ७०० मोठे खड्डे, जमिनीत गाडला जातोय संपूर्ण परिसर, कारण काय?
18
“साधूसंत झाडावर राहणार का? एक दिवस लोक सरकारला ‘चले जाव’ म्हणतील”; अण्णा हजारे संतापले
19
मैत्रिणींचा सोनमला वाचवण्याचा प्रयत्न? राजा रघुवंशीच्या भावाचा खळबळजनक आरोप
20
टाटा-हिंडाल्कोसह 'या' शेअर्समध्ये बंपर तेजी! बाजारात सलग दुसऱ्या दिवशी गुंतवणूकदारांची चांदी
Daily Top 2Weekly Top 5

ब्लू व्हेलच्या नादात विद्यार्थ्याचा इमारतीवरुन उडी मारुन आत्महत्येचा प्रयत्न, रुग्णालयात दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 15, 2017 12:00 IST

ब्लू व्हेल गेमच्या नादात आसाममधील कॉलेज विद्यार्थ्याने इमारतीवरुन उडी मारुन आत्महत्येचा प्रयत्न केल्याची घटना समोर आली आहे. सिलचर येथे ही घटना घडली आहे.

ठळक मुद्देब्लू व्हेल गेमच्या नादात आसाममधील कॉलेज विद्यार्थ्याचा इमारतीवरुन उडी मारुन आत्महत्येचा प्रयत्न तरुणाने इमारतीच्या छतावरुन उडी मारुन आत्महत्येचा प्रयत्न केलारुग्णालयात दाखल करण्यात आलं असून उपचार सुरु आहे

गुवाहाटी, दि. 15 - ब्लू व्हेल गेमच्या नादात आसाममधील कॉलेज विद्यार्थ्याने इमारतीवरुन उडी मारुन आत्महत्येचा प्रयत्न केल्याची घटना समोर आली आहे. सिलचर येथे ही घटना घडली आहे. दुस-या वर्षात शिकत असलेल्या तरुणाने इमारतीच्या छतावरुन उडी मारुन आत्महत्येचा प्रयत्न केला आहे. सध्या त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून उपचार सुरु आहे. 

खरंतर ब्लू व्हेल चॅलेंज ही एक अनेक टास्क्सची मालिका आहे. ज्यामधील अधिकाधिक टास्क्स् हे हिंसक असतात. या गेममध्ये सहभागी होणाऱ्याला 50 दिवसांपर्यंत अॅडमिनिस्ट्रेटरकडून विविध टास्क्स दिले जातात. बऱ्याच्या पौगंडावस्थेतील मुले या गेमला बळी पडतात. सहजपणे जाळ्यात ओढता येतील अशा मुलांना ब्ल्यू व्हेल चॅलेंजच्या अॅडमिनिस्ट्रेटरकडून हेरले जाते. चाइल्ड पोर्नोग्राफीप्रमाणेच दुसऱ्या दिशेला बसलेल्या व्यक्ती व्हर्च्युअल गप्पांमधून मुलांच्या कमकुवतपणाचा फायदा उठवतात. या चॅलेंज गेमसाठी कुणी मास्टरमाइंड किंवा कुठल्या माध्यमाची गरज नाही. ही एक प्रवृत्ती आहे जी सातत्याने फैलावत आहे.  असा हा मुलांच्या जीवावर बेतत असलेला गेम कुठल्याही वेबसाइट किंवा अॅपवर नसल्याने त्याला पायबंद घालणे आव्हानात्मक ठरणार आहे. 

ब्ल्यू व्हेल गेमचे पहिले प्रकरण 2015 साली उजेडात आले होते. तेव्हा सुसाइड ग्रुप किंवा डेथ ग्रुप्स या नावाने कुप्रसिद्ध झालेल्या ग्रुप्सनी रशियातील सोशल नेटवर्किंग Vkontakte वर मुलांना आत्महत्येसाठी प्रवृत्त केले होते.  2015 ते 2016 दरम्यान रशियामध्ये सुमारे 130 मुलांनी या चॅलेंजपायी आत्महत्या केल्या होत्या. त्यानंतर खडबडून जाग्या झालेल्या प्रशासनाने फिलिप बुदेकिन याला अटक केली होती.  ब्लू व्हेलमुळे जगभरात आतापर्यंत 250 जणांनी आत्महत्या केली आहे. 

काय असते ब्लू व्हेल चॅलेंज?ब्लू व्हेल हा व्हिडीओ गेम असून २0१३ साली रशियात त्याची सुरुवात झाली. तो खेळणा-याला 50 आव्हाने (चॅलेंजेस) दिली जातात. आव्हाने ५0 दिवसांत पूर्ण करायची असतात. आधी सोपी व नंतर नंतर कठीण आव्हाने दिली जातात. त्यात हाताच्या नसा कापणे, जनावराला मारणे व अंतिम टप्प्यात आत्महत्या करायला सांगणे आदींचा समावेश असतो. प्रत्येक आव्हान पूर्ण केल्यानंतर ते चित्रण गेमच्या क्युरेटरला पाठवायचे असते. अखेर सहभागींना आत्महत्या करण्याचे आव्हान दिले जाते.

ब्लू व्हेल गेमच्या मास्टरमाईंडची माहिती उघड; 17 वर्षीय रशियन मुलीला अटकमुलांना आत्महत्या करायला प्रवृत्त करणाऱ्या ब्लू व्हेल गेमच्या मास्टरमाईंडला अटक करण्यात आली. या गेमच्या मागील मास्टरमाईंड एक 17 वर्षाची रशियन मुलगी आहे. रशियात राहणाऱ्या या 17 वर्षाच्या मुलीवर अनेक मुलांना आत्महत्या करायला प्रवृत्त केल्याचा आरोप आहे. ही मुलगी नेमकी कोण आहे ?याबद्दलची माहिती पोलिसांनी अजून उघड केली नाही. पोलिसांच्या मते, ही मुलगी खेळाच्या जाळ्यात अडकलेल्या मुलांना तिने दिलेला आदेश ऐकला नाही,तर घरातील इतर व्यक्तीला जीवे मारण्याची धमकी देते. या गेममधील पीडित मुलांना ब्लेडच्या सहाय्याने स्वतःवर वार करायला, भितीदायक सिनेमे बघायला तसंच अर्ध्या रात्रीत उठायचे टास्क दिले जातात. गेम खेळणाऱ्या मुलाला नुकसान पोहचविण्याचा या मागील हेतू असतो. 

टॅग्स :Blue Whaleब्लू व्हेलSocial Mediaसोशल मीडियाSuicideआत्महत्या