बिहारमध्ये कोर्टाच्या आवारात स्फोट, २ ठार
By Admin | Updated: January 23, 2015 12:47 IST2015-01-23T12:42:44+5:302015-01-23T12:47:14+5:30
बिहारमधील आरा येथील सिव्हिल कोर्टात स्फोट होऊन दोन जण ठार तर ७ जण जखमी झाले आहेत.

बिहारमध्ये कोर्टाच्या आवारात स्फोट, २ ठार
ऑनलाइन लोकमत
बिहार, दि. २३ - बिहारमधील आरा येथील सिव्हिल कोर्टात स्फोट होऊन दोन जण ठार झाले आहेत. शुक्रवारी दुपारी हा स्फोट झाला असून त्यात एक महिला व पोलीस कॉन्स्टेबलसह दोन जण ठार तर ७ जण जखमी झाले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, कैद्यांना कोर्टांना हजर करताना हा स्फोट झाला. या स्फोटात ठार झालेली महिला बॅगमध्येच जिवंत बॉम्ब घेऊन जात होती. याप्रकरणी गृह मंत्रालयाने बिहार सरकारकडून अहवाल मागवला आहे.