कांदिवली कारशेडमध्ये रिकाम्या रेल्वेला आग

By Admin | Updated: September 5, 2015 00:36 IST2015-09-05T00:36:35+5:302015-09-05T00:36:35+5:30

A blank train in Kandivali Karshad | कांदिवली कारशेडमध्ये रिकाम्या रेल्वेला आग

कांदिवली कारशेडमध्ये रिकाम्या रेल्वेला आग

>कांदिवली कारशेडमध्ये रिकाम्या रेल्वेला आग
मुंबई:
कांदिवली येथील रेल्वे कारशेडमध्ये उभ्या असलेल्या रिकाम्या लोकलला शुक्रवारी रात्री पावणे अकराच्या सुमारास आग लागली. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे बंब घटनास्थळी दाखल झाले. रिकाम्या रेल्वेच्या दोन डब्यांना आग लागली असून या आगीत कोणतीही जिवीत हानी झाली नसल्याचे अग्निशमन दलाच्या अधिकार्‍यांनी सांगितले. रात्री उशिरापर्यंत आग विझवण्याचे काम सुरू होते.

Web Title: A blank train in Kandivali Karshad