राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यावर ब्लेडचे वार
By Admin | Updated: September 7, 2015 23:27 IST2015-09-07T23:27:43+5:302015-09-07T23:27:43+5:30
ठाणे : किरकोळ कारणावरून झालेल्या बाचाबाचीत अभिजित अंकुश पवार (२३) या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याला मारहाण करून त्याच्यावर ब्लेडने वार केल्याची घटना रोड क्रमांक १६ भागात घडली. याप्रकरणी चौघा अनोळखींविरुद्ध गुन्हा दाखल केल्याची माहिती श्रीनगर पोलिसांनी दिली.

राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यावर ब्लेडचे वार
ठ णे : किरकोळ कारणावरून झालेल्या बाचाबाचीत अभिजित अंकुश पवार (२३) या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याला मारहाण करून त्याच्यावर ब्लेडने वार केल्याची घटना रोड क्रमांक १६ भागात घडली. याप्रकरणी चौघा अनोळखींविरुद्ध गुन्हा दाखल केल्याची माहिती श्रीनगर पोलिसांनी दिली. किसननगर क्र. दोन येथून पवार हे रविवारी रात्रीच्या वेळी जात होते. त्या वेळी सार्वजनिक शौचालयात गेल्यानंतर त्यांच्याशी काही तरुणांचा किरकोळ कारणावरून वाद झाला. त्याचदरम्यान, या तरुणांनी त्यांच्यावर ब्लेडने वार केले. त्यांना एका खासगी रु ग्णालयात दाखल केले असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती पोलिसांनी दिली. हल्ला कोणी आणि कोणत्या कारणामुळे केला, हे मात्र समजू शकले नसल्याचे श्रीनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मुरलीधर कारकर यांनी सांगितले. (प्रतिनिधी)