काळ्या पैशासंबंधीचे विधेयक १० दिवसांत
By Admin | Updated: March 11, 2015 23:45 IST2015-03-11T23:45:47+5:302015-03-11T23:45:47+5:30
विदेशात साठवून ठेवला जाणारा पैसा बाहेर काढण्यासह आयकर विभागाचे हात बळकट करण्याच्या उद्देशाने आणल्या

काळ्या पैशासंबंधीचे विधेयक १० दिवसांत
नवी दिल्ली : विदेशात साठवून ठेवला जाणारा पैसा बाहेर काढण्यासह आयकर विभागाचे हात बळकट करण्याच्या उद्देशाने आणल्या जाणाऱ्या काळ्या पैशासंबंधी विधेयक येत्या १० दिवसांत संसदेत सादर केले जाईल, असा विश्वास केंद्रीय महसूल सचिव शक्तिकांता दास यांनी व्यक्त केला आहे.
संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्या टप्प्यातच ते सादर करण्याचा आमचा प्रयत्न असेल, असे ते बुधवारी सीआयआयच्या कार्यक्रमाला संबोधित करताना म्हणाले. संसद अधिवेशनाचा पहिला टप्पा २० मार्च रोजी संपत आहे.
अर्थमंत्री अरुण जेटली यांनी आपल्या अर्थसंकल्पीय भाषणात विदेशात साठवून ठेवल्या जाणाऱ्या काळ्या पैशाच्या प्रतिकूल परिणामांवर प्रभावीरीत्या मात करण्यासाठी नवा कायदा आणण्याची घोषणा केली होती. विदेशातील संपत्ती दडवून ठेवणाऱ्यांना १० वर्षांच्या सश्रम कारावासाची शिक्षा ठोठावण्याची तरतूद या कायद्यात असेल. (लोकमत न्यूज नेटवर्क)