बारुळ परिसरात रॉकेलचा काळा बाजार

By Admin | Updated: March 14, 2015 23:45 IST2015-03-14T23:45:41+5:302015-03-14T23:45:41+5:30

बारुळ : या परिसरात सुरू असलेल्या रॉकेलच्या काळ्या बाजाराकडे पोलिस दुर्लक्ष करीत आहे. अवैध वाहतूक करणारी वाहने मोठ्या प्रमाणात रॉकेलचा वापर करीत असल्याचे दिसते.

Black market of kerosene in Barul area | बारुळ परिसरात रॉकेलचा काळा बाजार

बारुळ परिसरात रॉकेलचा काळा बाजार

रुळ : या परिसरात सुरू असलेल्या रॉकेलच्या काळ्या बाजाराकडे पोलिस दुर्लक्ष करीत आहे. अवैध वाहतूक करणारी वाहने मोठ्या प्रमाणात रॉकेलचा वापर करीत असल्याचे दिसते.
संबंधित होलसेल व घाऊक विक्रेते कार्डधारकांना रॉकेल नाही, असे सांगतात व तेच रॉकेल ४० ते ५० रुपये लिटर प्रमाणे काळ्या बाजारात विक्री करीत आहेत. पोलिस व पुरवठा विभागाचा अशांना आशिर्वाद असल्याचे बोलले जाते. दरम्यान जिल्हाधिकार्‍यांनी तहसीलदारांना आदेश देवून वाहन तपासणी मोहीम राबविण्याचे सांगितले. नायब तहसीलदार उत्तम निलावार, यु.एस. वडवळकर, ए.बी. महाजन, व्ही.एल. चव्हाण यांनी १४ वाहनांची तपासणी केली. यातील एकामध्ये रॉकेल आढळले. त्या ऑटो चालकाविरुद्ध उस्माननगर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला, अशी माहिती नायब तहसीलदार निलावार यांनी दिली.

तुकाराम महाराज बीज सोहळा
लोहा : येथील श्री संत गाडगे महाराज महाविद्यालयात संत तुकाराम महाराज बीज सोहळा कार्यक्रम झाला. यावेळी माजी खा. केशवराव धोंडगे उपस्थित होते. यावेळी धोंडगे यांनी मार्गदर्शन केले. प्रास्ताविक प्राचार्य डॉ. अशोकराव गवते यांनी व्ही.जी. चव्हाण यांनी आभार मानले.
रासेयो शिबिराचा समारोप
लोहा : मौजे पोलेवाडी ता. लोहा येथे श्री संत गाडगे महाराज महाविद्यालयाच्या रासेयो शिबिराचा समारोप संस्थेचे सचिव गुरुनाथराव कुरुडे यांच्या उपस्थितीत झाला. यावेळी ॲड. मुक्तेश्वरराव धोंडगे, प्रा. शंकरराव आंबटवाड, मारोतराव कोल्हे, शिबिरार्थी मयुरी पालिमकर, कैलास बोरवले, अक्षय राठोड आदींनी मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक प्राचार्य अशोकराव गवते यांनी सुत्रसंचालन प्रा.डॉ. नानासाहेब सूर्यवंशी तर कार्यक्रमाधिकारी प्रा. जे.एस. सूर्यवंशी यांनी आभार मानले. यावेळी प्रा. माणिकराव कळणे, व्ही.जी. चव्हाण, बी.डी. जाधव, मुख्याध्यापक वैजनाथ खेडकर, विद्यार्थी संसद सचिव संदीप पवार, प्रा. एन.एन. बिंडे उपस्थित होते. (वार्ताहर)

ढोर समाजाची मराठवाडा कार्यकारिणी जाहीर
नांदेड : ढोर समाजाची मराठवाडा कार्यकारिणी जालना येथील बैठकीत जाहीर करण्यात आली. मराठवाडा अध्यक्षपदी लो‘ाचे माजी नगरसेवक नामदेव फुलपगार यांची निवङ झाली.
कार्यकारिणी अशी- उपाध्यक्ष नारायण चांदबोदले, महिला अध्यक्षा सरस्वती इंगोले, मुख्य संघटक भाऊसाहेब भाळशंकर, सदस्य बालाजी साबणे, दिपक इंगळे, शशीकला खरटमल आदी. (प्रतिनिधी)

Web Title: Black market of kerosene in Barul area

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.