पाटण्यात अण्णा समर्थकांनी केजरीवालांना दाखवले काळे झेंडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2015 10:16 IST2015-08-27T10:09:41+5:302015-08-27T10:16:07+5:30

एका चर्चासत्रास उपस्थित राहण्यासाठी आलेले दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना पाटणा विमानतळावर अण्णा हजारे समर्थकांनी काळे झेंडे दाखवत त्यांच्याविरोधात निदर्शने केली.

Black flags shown to Kejriwal by Anna supporters in Patna | पाटण्यात अण्णा समर्थकांनी केजरीवालांना दाखवले काळे झेंडे

पाटण्यात अण्णा समर्थकांनी केजरीवालांना दाखवले काळे झेंडे

ऑनलाइन लोकमत

पाटणा, दि. २७ - एका चर्चासत्रास उपस्थित राहण्यासाठी आलेले दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना पाटणा विमानतळावर अण्णा हजारे समर्थकांनी काळे झेंडे दाखवत त्यांच्याविरोधात निदर्शने केली. 'केजरीवाल वापस जाओ' अशा घोषणाही अण्णांच्या समर्थकांनी यावेळी दिल्या.

अरविंद केजरीवाल बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्यासह आज एका चर्चासत्रात सहभागी होणार असून त्यासाठी ते आज सकाळी पाटणा येथे आले. मात्र तेे विमानतलावर दाखल होताच ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारेंच्या समर्थकांनी त्यांच्या विरोधात घोषणा देत त्यांना काळे झेंडे दाखवले. 'अण्णांना धोका दिला' अशी नारेबाजीही त्यांनी केली. पोलिसांनी निदर्शकांना ताब्यात घेतले आहे.  केजरीवाल यांनी नितीश कुमार व लालूप्रसाद यादव यांना यापूर्वीच पाठिंबा जाहीर केला असून आपचे माजी नेते योगेंद्र यादव यांनी त्यांच्यावर टीकाही केली होती.

Web Title: Black flags shown to Kejriwal by Anna supporters in Patna