काळा झगा, कोटातून वकिलांची सुटका
By Admin | Updated: July 27, 2014 02:28 IST2014-07-27T02:28:25+5:302014-07-27T02:28:25+5:30
असह्य उन्हाळ्य़ात मनापासून नकोसे वाटत असूनही न्यायालयात काळा झगा व काळा कोट घालाव्या लागणा:या वकीलवर्गास दिलासादायक बातमी आहे.

काळा झगा, कोटातून वकिलांची सुटका
चेन्नई : असह्य उन्हाळ्य़ात मनापासून नकोसे वाटत असूनही न्यायालयात काळा झगा व काळा कोट घालाव्या लागणा:या वकीलवर्गास दिलासादायक बातमी आहे. बार कौन्सिल ऑफ इंडियाने ‘ड्रेसकोड’मध्ये सुधारणा केल्याने कनिष्ठ न्यायालयांमध्ये काम करताना वकिलांना काळा झगा व काळा कोट न घालण्याची मुभा मिळणार आहे.
मात्र उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयात वकिली करणा:या वकिलांना काळा कोट व काळा झगा घालूनच काम करावे लागेल, असे बार कौन्सिलने स्पष्ट केले आहे.
तामिळनाडूमधील महिला वकील संघटनेने विशेषत: उन्हाळ्य़ाच्या दिवसांत काळा कोट व काळा झगा घातल्याने होणारा त्रस व गैरसोय याकडे लक्ष वेधून बार कौनिस्ल ऑफ इंडियाकडे यातून मोकळीक देण्याची विनंती केली होती. त्यावर बार कौन्सिलने 16 जुलै रोजी पत्र पाठवून वरीलप्रमाणो खुलासा केला आहे. हा खुलासा तामिळनाडूतील वकिलांना केला गेला असला तरी बार कौन्सिलचे नियम संपूर्ण देशात लागू असल्याने कौन्सिलच्या या सुधारित ‘ड्रेसकोड’चा फायदा सर्वानाच मिळणार आहे.
सुधारित नियमांचा संदर्भ देऊन बार कौन्सिलने असे कळविले आहे, की उच्च व सर्वोच्च न्यायालय वगळता अन्य कनिष्ठ न्यायालयांमध्ये काळा झगा घालणो वकिलांना ऐच्छिक आहे. तसेच सर्वोच्च व उच्च न्यायालय वगळता इतर न्यायालयांमध्ये उन्हाळ्य़ाच्या दिवसांत वकिलांनी काळा कोट नाही घातला तरी चालण्यासारखे आहे. (वृत्तसंस्था)