शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
2
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
3
Raj Thackeray: राज ठाकरे मातोश्रीवर, उद्धव ठाकरेंना वाढदिवसाचे काय गिफ्ट देणार; युती की शुभेच्छाच...
4
Mansa Devi Stampede: गुदमरून टाकणारी गर्दी, एक अफवा अन्...; चेंगराचेंगरीपूर्वीचा व्हिडीओ आला समोर 
5
मोहम्मद मुइझ्झूंचा चीनला धक्का; भारतासोबत मुक्त व्यापार करार करण्याची व्यक्त केली इच्छा...
6
श्रावण विनायक चतुर्थी: दूर्वागणपती व्रत का करतात? वाचा, बाप्पाला प्रिय अमृतासमान दुर्वा कथा
7
यापेक्षा चांगली संधी मिळणार नाही; ही कंपनी आपल्या कारवर देतेय १ लाख रुपयांची सूट
8
कुठे गेला 'श्वास'मधला चिमुकला 'परश्या'? २९ वर्षीय तरुणाने आता धरली वेगळीच वाट
9
IND vs ENG: गिल-राहुलची फलंदाजी अन् स्टोक्सची तंदुरूस्ती... 'या' ५ गोष्टी ठरवतील चौथ्या कसोटीचा निकाल
10
चातुर्मासातील पहिली श्रावण विनायक चतुर्थी: गणपती होईल प्रसन्न, कसे कराल व्रतपूजन? शुभच घडेल
11
पहिला श्रावणी सोमवार: ‘असे’ करा शिवपूजन, कोणती शिवामूठ वाहावी? पाहा, महत्त्व अन् मान्यता
12
Corona Virus : संकटं संपता संपेना! कोरोना महामारीचा मेंदूवर भयंकर परिणाम, संसर्ग झाला नसला तरी...
13
प्राडाच्या वादानंतर कोल्हापुरी चप्पलांना QR कोड! संघटनेने का घेतला असा निर्णय? जाणून घ्या कोल्हापुरीचा इतिहास!
14
Pune Rave Party: "तुमच्या तर दिव्याखालीच अंधार"; चित्रा वाघांनी सुप्रिया सुळे, रोहिणी खडसेंना सुनावले
15
"पंतप्रधान नरेंद्र मोदी हे विष्णूचे ११ वे अवतार, डोनाल्ड ट्रम्प त्यांना..."; भाजपा नेत्याचा मोठा दावा
16
आजारी लेकीला रुग्णालयात घेऊन चाललेले वडील, BMW ची धडक; मन हेलावून टाकणारी घटना
17
"कोणी ड्रममध्ये भरत आहे तर कोणी...", शिव ठाकरेला वाटते लग्नाची भीती, म्हणाला- "हा तर कर्मा..."
18
Pune Rave Party: रेव्ह पार्टी उधळल्यानंतर रोहिणी खडसेंच्या घराची झाडाझडती, पोलिसांना मिळाल्या तीन गोष्टी 
19
दुबईत सोनं खरंच स्वस्त मिळतं? भारतात आणण्याचे नियम काय? किती टॅक्स लागतो? सर्व काही जाणून घ्या
20
Eknath Khadse : "दोषी असेल तर..."; रेव्ह पार्टीत जावयाला अटक होताच एकनाथ खडसेंनी स्पष्टच सांगितलं

एनडीएत भाजपचे वजन वाढले, ‘इंडिया’त काँग्रेसचे कमी झाले; घटक पक्षांची चिंता वाढली

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 4, 2023 07:01 IST

काँग्रेसच्या पराभवामुळे घटक पक्षांच्या चिंतेतही भर

सुनील चावकेनवी दिल्ली : मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगडमधील जबरदस्त विजयामुळे २०२४ च्या लोकसभा निवडणुकीद्वारे नरेंद्र मोदी यांना सलग तिसऱ्यांदा पंतप्रधानपद मिळवून देण्याची भाजपची सज्जता झाली आहे, तसेच या विजयानंतर रालोआतील घटक पक्षांसाठी आता भाजप म्हणेल तीच पूर्वदिशा ठरणार आहे. दुसरीकडे, मोठ्या पराभवाचा सामना करावा लागल्यामुळे ‘इंडिया’ आघाडीच्या वाटाघाटीत काँग्रेसची क्षमता घटणार आहे. काँग्रेसचे वर्चस्व कमी झाल्यामुळे घटक पक्षांना हायसे वाटणार असले तरी काँग्रेसच्या सुमार कामगिरीमुळे त्यांचीही चिंता वाढली आहे.

रालोआत आता भाजप म्हणेल तीच पूर्वदिशा

भाजपची ३४ घटक पक्षांच्या राष्ट्रीय लोकशाही आघाडीवरील (एनडीए) पकड आणखी घट्ट झाली आहे. एनडीएमध्ये भाजपपाठोपाठ महाराष्ट्रातील शिवसेना (शिंदे गट) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) या दोन सर्वांत मोठ्या घटक पक्षांना लोकसभा निवडणुकीत भाजपने दिलेला जागावाटपाचा फॉर्म्युला मान्य करावा लागणार आहे.

उत्तर भारताच्या हिंदी पट्ट्यातील तिन्ही राज्ये जिंकणाऱ्या भाजपसाठी कर्नाटकपाठोपाठ तेलंगणाच्या निकालाने दक्षिण भारताचे दार बंद केले आहे. गेल्या लोकसभा निवडणुकीत कर्नाटकात २६, तर तेलंगणमध्ये ४ जागा जिंकणाऱ्या भाजपला दक्षिणेतील राज्यांमध्ये जम बसविण्यासाठी नव्याने ताकद लावावी लागणार आहे.

उत्तर प्रदेश, बिहार, हरयाणा, आसाम आदी राज्यांतील मित्रपक्षांनाही भाजप देईल तेवढ्या जागा लढविण्यावर समाधान मानावे लागेल. तीन राज्यांतील विजयामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह आणि राष्ट्रीय अध्यक्ष जगतप्रकाश नड्डा ही त्रिमूर्ती आणखी ताकदवान झाली असून, त्यांना पक्षांतर्गत आव्हान उरलेले नाही.

मध्य प्रदेश आणि राजस्थानया दोन्ही राज्यांमध्ये शिवराजसिंह चौहान आणि वसुंधरा राजे शिंदे यांच्याऐवजी मुख्यमंत्रिपदासाठी नव्या चेहऱ्यांचा विचार करण्याची नामी संधी भाजपश्रेष्ठींना मिळाली आहे. गेल्या काही आठवड्यांपासून आणखी एका राज्यात नेतृत्वबदल होणार असल्याची चर्चा दिल्लीच्या वर्तुळात सुरू आहे.

‘इंडिया’ आघाडीच्या जागावाटप वाटाघाटीत आता असेल वेगळे चित्र

भाजपशी थेट लढत असलेल्या राज्यांपैकी काँग्रेस मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमध्ये सहज विजय मिळवेल आणि राजस्थानमध्येही जोरदार टक्कर देऊन स्पर्धेत राहील, असे चित्र रंगविले जात होते. त्यातच तेलंगणामध्ये काँग्रेसची लाट आल्यामुळे या निवडणुकांनंतर लोकसभेच्या ‘फायनल’साठी होणाऱ्या जागावाटपात काँग्रेसचे वर्चस्व वाढेल, अशी भीती ‘इंडिया’ आघाडीच्या नेत्यांना वाटत होती. 

तीनपैकी दोन राज्यांमध्ये काँग्रेसचा विजय भाजपसाठी डोकेदुखी निर्माण करणारा ठरला असता. २०१८ च्या विधानसभा निवडणुका जिंकून मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगडमध्ये सत्तेत येऊनही काँग्रेस पक्ष २०१९ सालच्या लोकसभा निवडणुकीत या राज्यांतील लोकसभेच्या ६५ पैकी ६२ जागा जिंकणाऱ्या भाजपला रोखू शकला नव्हता. 

लोकसभा निवडणुकीत मध्य प्रदेश, कर्नाटक, गुजरात, राजस्थान, आसाम, छत्तीसगड, हरयाणा, उत्तराखंड, हिमाचल या राज्यांमधील १५२ मतदारसंघांमध्ये काँग्रेस-भाजप थेट लढत होईल. शिवाय महाराष्ट्र, बिहार, उत्तर प्रदेश, झारखंड, पंजाब, दिल्ली या राज्यांतील २०२ मतदारसंघांत शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, जनता दल युनायटेड, राष्ट्रीय जनता दल, सपा, झामुमो, आप या मित्रपक्षांसोबत काँग्रेस उतरेल.

काँग्रेसने भाजपविरुद्ध सरळ लढत होत असलेल्या मतदारसंघांमध्ये आपली संपूर्ण ताकद लावून जास्तीत जास्त जागा जिंकण्याचा प्रयत्न करावा आणि ‘इंडिया’ आघाडीत जागावाटपात अनावश्यक समस्या निर्माण करू नये, असे मत आता ‘इंडिया’ आघाडीतील घटक पक्षांचे नेते व्यक्त करीत आहेत.

राहुल गांधी यांच्यासाठी कमलनाथ, दिग्विजय सिंह आणि अशोक गहलोत या काँग्रेसमधील तीन स्वयंभू नेत्यांना मध्य प्रदेश आणि राजस्थानच्या राजकारणातून बाजूला काढण्याचा मार्ग प्रशस्त झाला आहे. या तिन्ही नेत्यांच्या काँग्रेसमधील राजकीय कारकीर्दीला आता विराम मिळणार, अशी चर्चा सुरू झाली आहे.

टॅग्स :BJPभाजपाElectionनिवडणूकINDIA Opposition Allianceइंडिया आघाडीNarendra Modiनरेंद्र मोदी