महाराष्ट्रात भाजपाची भिस्त मोदींच्या सभांवर
By Admin | Updated: October 1, 2014 02:10 IST2014-10-01T02:10:19+5:302014-10-01T02:10:19+5:30
अमेरिका जिंकणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी आता महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात उतरणार आहेत.
महाराष्ट्रात भाजपाची भिस्त मोदींच्या सभांवर
>हरीश गुप्ता - नवी दिल्ली
अमेरिका जिंकणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी आता महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात उतरणार आहेत. मोदींच्या अमेरिकावारीने उत्साह दुणावलेल्या भाजपाच्या नेतृत्वाने महाराष्ट्रातील मते काबीज करण्यासाठी त्यांच्या सात दिवसांत 22 प्रचारसभा ठेवल्या आहेत.
प्रचार व्यवस्थापकांनी मोदींच्याच रॅलींवर भर दिला असून दसरा आटोपताच 4 ऑक्टोबर रोजी मोदी मुंबईतील रेसकोर्स येथून प्रचाराचा शुभारंभ करतील. त्यानंतर कोल्हापूर, बीडला सभा घेतील. दिवसाला तीन- ते चार रॅली असा त्यांचा धडाका असेल. मोदी हे स्टार प्रचारक असून त्यांच्या प्रभावाचा अधिकाधिक वापर करण्याची भाजपाची योजना आहे.
विधानसभा निवडणुकीत भाजप-शिवसेनेची महायुती तसेच काँग्रेस- राष्ट्रवादीची आघाडी मोडल्यानंतर पंचरंगी लढती रंगणार आहेत. त्यामुळे मोदींच्या करिश्म्यावरच भाजपाची भिस्त असेल. ‘मोदी को महाराष्ट्र दो’ चा नारा घेऊनच हा पक्ष मैदानात उतरेल.
शिवसेनेवर हल्ला न करता काँग्रेस- राष्ट्रवादीची राजवट हाच प्रचाराचा मुख्य मुद्दा असेल. आम्ही शिवसेनेला रालोआची साथ सोडायला सांगितलेले नाही. मतभेद असले तरी शिवसेना रालोआत कायम राहील, अशी आशा भाजपाचे सरचिटणीस राजीव प्रताप रुडी यांनी व्यक्त केली आहे. युती तुटल्याच्या पाश्र्वभूमीवर मोदींच्या अमेरिकावारीच्या प्रभावाचा प्रचारासाठी वापर करण्याचा भाजपाचा प्रयत्न आहे.
5क् हजारांवर स्वयंसेवकांची फौज..
च्केंद्रीय मंत्री नितीन गडकरी संपूर्ण राज्यात प्रचारसभा घेणार असून स्मृती इराणी 4 ऑक्टोबरनंतर प्रचारात सक्रिय होतील. माजी क्रिकेटपटू नवज्योतसिंग सिद्धू हे प्रचारात उतरतील. भाजपच्या लोकसभा आणि राज्यसभा सदस्यांना विविध मतदारसंघांमध्ये विशिष्ट जबाबदारी देण्यात आली आहे.
च्4 ऑक्टोबरपासून रा.स्व. संघाचे सुमारे 5क् हजारावर कार्यकर्ते दारोदार प्रचारावर भर देतील. पोटनिवडणुकीच्या तीन टप्प्यात पिछेहाट झाल्याने भाजपा पूर्ण दक्ष राहणार आहे.