शहरं
Join us  
Trending Stories
1
यवत हिंसाचारात कोणाचं किती नुकसान, सध्याची परिस्थिती कशी? जाणून घ्या ताजी अपडेट्स!
2
IND vs ENG 5th Test Day 2, Stumps : दिवसभरात १५ विकेट्स! यशस्वी खेळीसह टीम इंडियाला दिलासा
3
४० वर्षाच्या लढ्याला यश, कोल्हापूरला सर्किट बेंच मंजूर; मुंबई हायकोर्टाचे नोटिफिकेशन प्रसिद्ध
4
IND vs ENG : सिराजसह प्रसिद्ध कृष्णानं मारला 'चौकार'! यजमान इंग्लंडचा पहिला डाव अल्प आघाडीसह संपला
5
ऐसे लोग *** होते है! महबूब मुजावर यांचं नाव घेताच अरविंद सांवत संतापले!
6
IND vs ENG : मियाँ मॅजिक! ओव्हलच्या मैदानात DSP सिराजनं साजरं केलं 'द्विशतक'
7
National Film Awards: 'श्यामची आई' मराठी चित्रपटानं जिंकला राष्ट्रीय पुरस्कार, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी…
8
IND vs ENG : जो रुट अन् प्रसिद्ध कृष्णा यांच्यात राडा; भांडण सोडवायला आलेल्या पंचावर KL राहुल चिडला
9
Video: रागावलेल्या सिंहीणपुढे सिंहाचीच झाली 'शेळी'... जंगलच्या राजाची अवस्था पाहून तुम्हालाही येईल हसू
10
आव्वाज कुणाचा... मराठीचा !! 'या' मराठी चित्रपटांना मिळाला राष्ट्रीय पुरस्कार; पाहा विजेत्यांची यादी
11
शेतकऱ्यांसाठी मिळालेली रक्कम अधिकाऱ्यांनी कार खरेदीसाठी उडवली, कृषिमंत्री म्हणाले...   
12
तुर्भ्यात एनएमएमटीच्या भरधाव बसनं ६ जणांना उडवलं, चालकाविरोधात गुन्हा दाखल
13
शेतकऱ्यांच्या हिताशी तडजोड नाही, दबावाखाली करार करणार नाही, २५% टॅरिफबाबत भारताची स्पष्ट भूमिका
14
'किंग' खानच्या राजमुकुटाला राष्ट्रीय पुरस्काराचं 'कोंदण'; विक्रांत मेस्सी, राणी मुखर्जी यांचाही सर्वोच्च सन्मान
15
"पाकिस्तान एक दिवस भारताला तेल विकेल" म्हणत डोनाल्ड ट्रम्प यांनी डिवचलं, भारताची भूमिका काय?
16
Daya Nayak: थर्टी फर्स्टची रात्र अन् छोटा राजन गँगचे दोन शूटर; दया नायक यांच्या पहिल्या एन्काऊंटरची गोष्ट
17
Vivo T4R 5G: अवघ्या १७,४९९ रुपयांत विवोनं आणलाय जबरदस्त फोन, बघताच आवडेल!
18
'भारत-रशिया वेळोवेळी एकमेकांच्या बाजूने उभे', डोनाल्ड ट्रम्प यांच्या टीकेनंतर भारताचे प्रत्युत्तर
19
'फुटबॉलसम्राट' मेस्सी भारतात येणार.. रोहित, विराट, सचिनसोबत वानखेडेवर क्रिकेट मॅच खेळणार!
20
"माझ्याकडे मुस्लीम कामगार, कुणीतरी ओरडलं ही बेकरी..."; यवतमध्ये जमावाने जाळलेल्या बेकरीचं सत्य समोर

भाजपाची अटकळ : कुमारस्वामी सरकार लवकरच कोसळेल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2018 00:51 IST

येडियुरप्पा, श्रीरामुलू राज्यातच राहणार

हरिश गुप्ता।नवी दिल्ली : आमदार होताच बी. एस. येडियुरप्पा यांच्यासह बी. श्रीरामुलू यांनी लगेचच खासदारकीचे राजीनामे दिले. त्यांना राज्यातच ठेवून कुमारस्वामी यांचे सरकार पडण्याची वा प्रसंगी पाडण्याची भाजपा वाट पाहत आहे. तेथील सत्ता पुन्हा काबीज करण्यासाठी या नेत्यांनी कर्नाटकातच असावे या हेतूनचे भाजपच्या श्रेष्ठींनी हा निर्णय घेतला. त्यामुळे कर्नाटकात भाजपा आमदारांची संख्या १0४ राहील आणि सरकार बनवण्याची वेळ आली तर फारशी अडचण येणार नाही, असे गणित आहे.या दोघांच्या राजीनाम्यामुळे भाजपचे लोकसभेतील संख्याबळ २७२ म्हणजे बहुमतासाठी आवश्यक असलेल्या आकड्यावर येऊ न ठेपले आहे. लोकसभा की विधानसभा याचा विचार करण्यासाठी येडियुरप्पा व श्रीरामुलू यांच्याकडे पुरेसा वेळ होता. पण या दोघांनी लोकसभा सदस्यत्वाचा राजीनामा द्यावा असा निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदी व भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांनी घेतला.भाजपची कर्नाटकमधील जबाबदारी असलेल्या अमित शहा यांच्या निकटवर्तीयाने ‘लोकमत’ला सांगितले की, कुमारस्वामी सरकारआघाडी फार काळ टिकणार नाही. शपथविधीनंतर दोन पक्षांतील अंतर्गत मतभेद उफाळून येतील व हे सरकार कोसळेल. त्यामुळे तिथे आमचे पुरेसे आमदार असणे गरजेचे आहे.सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाने लगेचच बहुमत सिद्ध करायला सांगितल्यो भाजपचे सारे मनोरथ कोसळले. हे आव्हान पेलतायेणे शक्य नाही हे लक्षातआल्यानंतर येडियुरप्पा यांनी विश्वासदर्शक ठरावाला सामोरे न जाताच मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला होता.आता काँग्रेसने जनता दलाला मुख्यमंत्रीपद दिले असले तरी महत्त्वाची खाती स्वत:कडे ठेवण्यासाठी काँग्रेस कुमारस्वामींवर दबाव आणेल. त्यामुळे तीन महिन्यांतच सरकार कुचकामी असल्याचे सिद्ध होईल असे भाजपला वाटते. बिहारमध्ये लालूप्रसाद व नितीशकुमार यांची युती जशी टिकू शकली नाही, तसाच प्रकार कर्नाटकात होईल, त्यामुळे येडियुरप्पा व श्रीरामुलू तिथेच असावेत, असे भाजपाचे म्हणणे आहे.इतिहासाची पुनरावृत्ती होण्याची शक्यताएच. डी. देवेगौडा यांना सरकार बनविण्यासाठी काँग्रेसने बाहेरून पाठिंबा दिला होता आणि १0 महिन्यांत हात वर केले. इंदरकुमार गुजराल यांना काँग्रेसने फक्त २० महिनेच पाठिंबा दिला होता. त्यानंतर देश लोकसभा निवडणुकांना सामोरा गेला. याच इतिहासाची पुनरावृत्ती कर्नाटकात होईल, असा विश्वास भाजपला आहे. तसेच २०१९च्या लोकसभा निवडणुकांआधी काँग्रेसने कुमारस्वामींचा पाठिंबा काढून घेतल्यास विधानसभा निवडणुका घ्याव्या लागतील, असाही भाजपाचा होरा आहे.

टॅग्स :Karnataka Assembly Elections 2018कर्नाटक विधानसभा निवडणूक २०१८BJPभाजपा