भाजपाची दक्षिण गोवा कार्यकारिणी जाहीर
By Admin | Updated: February 17, 2016 00:24 IST2016-02-17T00:24:54+5:302016-02-17T00:24:54+5:30
मडगाव : भाजपाचे आमदार असलेल्या मतदारसंघांत मगोकडून सुरू असलेल्या कामास आमची हरकत नाही. भाजपाचेही काम कुंभारजुवे, प्रियोळ या मतदारसंघांत चालू आहे, असे सूचक उद्गार भाजपाचे प्रदेशाध्यक्ष विनय तेंडुलकर यांनी मडगावात घेतलेल्या पत्रकार परिषदेत काढले. येत्या विधानसभा निवडणुकीत भाजपाने 26 विजयी जागांचे लक्ष्य ठेवले आहे. त्यापैकी 13 मतदारसंघ दक्षिण गोव्यातील असतील, असे ते म्हणाले.

भाजपाची दक्षिण गोवा कार्यकारिणी जाहीर
म गाव : भाजपाचे आमदार असलेल्या मतदारसंघांत मगोकडून सुरू असलेल्या कामास आमची हरकत नाही. भाजपाचेही काम कुंभारजुवे, प्रियोळ या मतदारसंघांत चालू आहे, असे सूचक उद्गार भाजपाचे प्रदेशाध्यक्ष विनय तेंडुलकर यांनी मडगावात घेतलेल्या पत्रकार परिषदेत काढले. येत्या विधानसभा निवडणुकीत भाजपाने 26 विजयी जागांचे लक्ष्य ठेवले आहे. त्यापैकी 13 मतदारसंघ दक्षिण गोव्यातील असतील, असे ते म्हणाले.भाजपाची दक्षिण गोवा कार्यकारिणी जाहीर करण्यासाठी तेंडुलकर यांनी पत्रकार परिषद घेतली. या वेळी दक्षिण गोवा कार्यकारिणीचे अध्यक्ष सर्वानंद भगत तसेच सरचिटणीस रूपेश महात्मे हे उपस्थित होते.तेंडुलकर यांनी प्रत्येक मतदारसंघात आपले बळ वाढविणे हे प्रत्येक राजकीय पक्षाचे काम आहे. मात्र, ज्या वेळी मगो व भाजपात युती असेल त्या वेळी दोन्ही पक्ष एकमेकांना साहाय्य करतील. राज्यातील भाजपाचे काम समाधानकारक असून माध्यम प्रश्न तसेच सध्या वादग्रस्त झालेल्या वृक्षसंवर्धन कायद्यासंदर्भात पक्षाकडून लवकरच योग्य तो निर्णय घेतला जाईल. विरोधकांनी कितीही दावा केला तरी गोव्यातील भाजपाचे स्थान भक्कम असून जिल्हा पंचायत व नगरपालिका निवडणुकीत भाजपाची कामगिरी त्याचे प्रमाणपत्र असल्याचे सांगितले. दक्षिण गोव्याची 49 सदस्यांची कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. त्यात अध्यक्षपदी सर्वानंद भगत, उपाध्यक्षपदी अलका पोतदार, कृष्णा साळकर, प्रदीप नाईक व गणेश वेळीप, सरचिटणीस म्हणून रूपेश महात्मे, दीपक बोरकर व सुनील देसाई, सचिव म्हणून समीरा कादरेज, उल्हास तुयेकर, संतोष केरकर तर खजिनदार म्हणून राजीव सुखठणकर यांची निवड करण्यात आली आहे. 26 सदस्यांमध्ये जिल्हा पंचायत सदस्य पुष्पा अय्या, वास्कोच्या भावना भोसले, मडगावच्या शैला पार्सेकर, कुंकळ्ळीचे विशाल देसाई, काणकोणचे भूषण प्रभूगावकर तसेच मडगावचे सुनील नाईक यांचा समावेश आहे. (प्रतिनिधी)ढँ3 : 0902-टअफ-09कॅप्शन: पत्रकार परिषदेत बोलताना विनय तेंडुलकर. सोबत रूपेश महात्मे व सर्वानंद भगत. (पिनाक कल्लोळी)