शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

विरोधकांना धूळ चारण्यासाठी भाजपचा सिक्रेट प्लॅन तयार, देशभरातील प्रमुख नेत्यांवर लक्ष; २०२४च्या लोकसभेसाठी तयारी सुरू

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 23, 2023 11:00 IST

२०१९ साली झालेल्या लोकसभा निवडणुकांत हार पत्करावी लागलेल्या १६५ लोकसभा मतदारसंघांवर भाजपने लक्ष केंद्रित केले आहे.

-हरिश गुप्ता

नवी दिल्ली : २०२४च्या लोकसभा निवडणुकांत देशातील विरोधी पक्षांच्या प्रमुख नेत्यांचा पराभव करण्यासाठी भाजपने एक  योजना आखली आहे. या निवडणुकांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भाजपला हरविण्यासाठी विरोधी पक्षांमध्ये आघाडी करण्याबाबत अद्याप एकमत झालेले नाही. मात्र भाजपने मात्र आपल्या विजयासाठी जोरदार पूर्वतयारी सुरू केली आहे. 

२०१९ साली झालेल्या लोकसभा निवडणुकांत हार पत्करावी लागलेल्या १६५ लोकसभा मतदारसंघांवर भाजपने लक्ष केंद्रित केले आहे. मात्र विरोधी पक्षांतील प्रमुख नेत्यांचा पराभव करण्यासाठी लोकसभेच्या निवडक २० जागांवर विशेष लक्ष देण्यात येईल. या मतदारसंघांची जबाबदारी केंद्रीय मंत्र्यांना सोपविण्याचा निर्णय भाजपने घेतला आहे. 

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार व त्यांच्या कुटुंबीयांचा बालेकिल्ला असलेल्या बारामती लोकसभा मतदारसंघाची जबाबदारी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्याकडे सोपविण्यात आली आहे. बारामती मतदारसंघातून शरद पवार यांच्या कन्या सुप्रिया सुळे लोकसभेवर निवडून आल्या आहेत. या लोकसभा मतदारसंघात भाजपची कामगिरी उंचावण्यासाठी निर्मला सीतारामन यांनी काही कालावधीच्या अंतराने दोन ते तीन दिवस मुक्काम करावा व पक्षकार्याचा विस्तार करावा असे ठरविण्यात आले आहे.

भाजपने लोकसभा निवडणुकीसाठी मोठी तयारी केली असून, यासाठी राम मंदिर आणि हिंदुत्त्वाचा मुद्दा प्रचारासाठी घेण्यात येणार आहे. अयोध्येतील राम मंदिराचे बांधकामही लवकरच पूर्ण होणार असून, त्याचा भाजपला फायदा होण्याची शक्यता आहे.

सोनिया गांधी, राहुल अन् प्रियांका यांना रोखणार..अमेठी मतदारसंघात २०१९ साली काँग्रेस नेते राहुल गांधी यांचा केंद्रीय महिला व बालकल्याण खात्याच्या मंत्री स्मृती इराणी यांनी पराभव केला. त्यानंतर आता भाजपचे रायबरेली मतदारसंघाकडे लक्ष लागले आहे. या मतदारसंघातून सोनिया गांधी कदाचित आगामी लोकसभा निवडणूक न लढविता त्यांच्याऐवजी तिथे प्रियांका गांधी रिंगणात उतरण्याची शक्यताही व्यक्त केली जात आहे. त्यांना रोखण्यासाठी खास प्लॅन तयार केला जात आहे. 

लोकसभा निवडणुकांत रायबरेली मतदारसंघात काँग्रेसच्या माजी पक्षाध्यक्ष सोनिया गांधी यांचा पराभव होण्याच्या दृष्टीने या मतदारसंघाची जबाबदारी कृषिमंत्री नरेंद्रसिंह तोमर यांच्यावर सोपविली आहे. 

कशी आहे व्यूहरचनामध्य प्रदेशमधील छिंदवाडा लोकसभा मतदारसंघाची जबाबदारी केंद्रीय मंत्री गिरीराज सिंह यांना देण्यात आली आहे. या जागेवर कमलनाथ यांचा पराभव करण्यासाठी व्यूहरचना करण्यात येणार आहे. परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर हे मध्यंतरी तामिळनाडू, केरळच्या दौऱ्यावर गेले होते. त्यांच्यावरही भाजपने काही राजकीय कामगिरी सोपविण्यात आल्याची चर्चा आहे. १९८४ साली झालेल्या लोकसभा निवडणुकांत राजीव गांधी यांनीदेखील अटलबिहारी वाजपेयी यांच्यासह अन्य विरोधी पक्षनेत्यांविरोधात सबळ उमेदवार उभे केले होते.

टॅग्स :BJPभाजपा