शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
3
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
4
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
5
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
6
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
7
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
8
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
9
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
10
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
11
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
12
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
13
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
14
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
15
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
16
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
17
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
18
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
19
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
20
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
Daily Top 2Weekly Top 5

भाजपाच्या बंडखोर नेत्यानेच दिला झारखंडच्या मुख्यमंत्र्यांना धोबीपछाड  

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 23, 2019 22:52 IST

झारखंडमध्ये भाजपाला दुहेरी धक्का बसला आहे. पक्षाच्या पराभवाबरोबरच भाजपाचे मुख्यमंत्री रघुवर दास यांनाही पराभवाचा सामना करावा लागला आहे.

रांची - झारखंड विधानसभा निवडणुकीत भाजपाला दारुण पराभव पत्करावा लागला आहे. झारखंड मुक्ती मोर्चा, काँग्रेस आणि राष्ट्रीय जनता दल यांच्या आघाडीने भाजपाला धोबीपछाड दिला आहे. भाजपाचे मुख्यमंत्री रघुवर दास यांनाही पराभवाचा सामना करावा लागला आहे. मात्र रघुवर दास यांचा पराभव विरोधी पक्षाच्या कुण्या उमेदवाराने नव्हे तर भाजपाच्याच एका बंडखोर ज्येष्ठ नेत्याने केला आहे. बिहार आणि झारखंडमधील मिळून तीन मुख्यमंत्र्यांना तुरुंगाची हवा खायला लावणाऱ्या आणि ऐन निवडणुकीपूर्वी भाजपाला सोडचिठ्ठी देत अपक्ष उमेदवार म्हणून रिंगणात उतरलेल्या सरयू राय यांनी रघुवर दास यांचा पराभव केला आहे.   भाजपाचे ज्येष्ठ नेते असलेले सरयू राय हे रघुवर दास यांच्या सरकारमध्ये मंत्री होते. मात्र राय आणि दास यांच्यात अनेक मुद्द्यांवरून मतभेद होते. त्यामुळे सरयू राय हे रघुवर दास यांच्या कॅबिनेटने घेतलेल्या निर्णयांना विरोध करत असत. तसेच अनेकदा कॅबिनेटच्या बैठकीस अनुपस्थित राहत असत. दरम्यान, झारखंड विधानसभा निवडणुकीसाठी अखेरच्या क्षणापर्यंत त्यांच्या उमेदवारीबाबत निर्णय घेण्यात आला नव्हता. त्यामुळे अखेरीस त्यांनी भाजपाला सोडचिठ्ठी देत मुख्यमंत्री रघुवर दास यांच्याविरोधात जमशेदपूर पूर्व मतदारसंघातून अपक्ष म्हणून निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याच निर्णय घेतला. तसेच रघुवर दास यांचा मोठ्या मताधिक्याने पराभवही करून दाखवला. सरयू राय यांनी रधुवर दास यांच्यावर निर्णायक मतांची आघाडी घेतली आहे. मात्र निवडणूक आयोगाकडून राय यांच्या विजयाची घोषणा अध्याप झालेली नाही. झारखंडमधील राजकारणाचा विचार केल्यास या राज्यात गेल्या 19 वर्षांत अनेक मुख्यमंत्र्यांना निवडणुकीत पराभवाचा सामना करावा लागला आहे. आता त्यात रघुवर दास यांचेही नाव दाखल झाले आहे. दरम्यान, रघुवर दास यांना पराभूत करणाऱ्या सरयू राय यांनी पशुपालन घोटाळ्यासह अनेक घोटाळे उघडकीस आणलेले आहेत. तसेच लालू प्रसाद यादव अनेक नेत्यांना तुरुंगाची वाट दाखवली होती.  

टॅग्स :jharkhand election 2019झारखंड निवडणूक 2019BJPभाजपाPoliticsराजकारण