शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
4
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
5
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
6
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
7
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
8
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
9
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
10
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
11
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
12
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
13
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
14
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
15
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
16
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
17
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
18
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
19
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
20
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
Daily Top 2Weekly Top 5

भाजपच्या रविशंकर प्रसाद यांचा दावा फोल, मोदी सरकारच्याच काळात 'राफेल डील'

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 24, 2018 12:53 IST

भाजपने आपल्या ट्विटर हँडलवरुन विरोधकांच्या टीकेला उत्तर दिले आहे. 22 सप्टेंबर रोजी भाजपने ट्विट करताना म्हटले की, फेब्रुवारी 2013 मध्ये ज्यावेळी युपीए सरकार सत्तेत होते.

नवी दिल्ली - फ्रान्सचे राष्ट्रपती फ्रांस्वा ओलांदा यांनी राफेल करारावरुन केलेल्या वक्तव्यानंतर देशातील राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. भारत सरकारनेच अनिल अंबानी यांच्या कंपनीचे नाव राफेल विमान खरेदीच्या करारासाठी सूचवले होते, असे ओलांद यांनी म्हटले आहे. तर, फ्रान्स सरकारकडे दुसरा पर्यायही नव्हता. यावरुन सध्या देशात राजकीय गदारोळ माजला आहे. तर पंतप्रधान नरेंद्र मोदींना चोर संबोधून टार्गेट केलं जात आहे. 

भाजपने आपल्या ट्विटर हँडलवरुन विरोधकांच्या टीकेला उत्तर दिले आहे. 22 सप्टेंबर रोजी भाजपने ट्विट करताना म्हटले की, फेब्रुवारी 2013 मध्ये ज्यावेळी युपीए सरकार सत्तेत होते. तेव्हापासून, राफेल विमान निर्माता दसॉल्ट एविएशन आणि रिलायन्स डिफेंस यांमध्ये भागिदारी झाली होती. तर केंद्रीय संसदमंत्री रविशंकर प्रसाद यांनीही आपल्या ट्विटरवरुन हाच कित्ता पुन्हा गिरवला. तर आम्ही सत्तेच येण्यापूर्वीच 1 वर्ष 4 महिने अगोदर हा करार झाल्याचे प्रसाद यांनी म्हटले. त्यानुसार, दसॉल्ट एविएशन आणि रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड यांमध्ये एका करारावर हस्ताक्षर झाले आहे. त्यामुळे राफेल करारामध्ये रिलायन्सचा सहभाग हे काँग्रेस सरकारचाच भाग असल्याचा दावा भाजपाने केला आहे. मात्र, याबाबतचे सत्य काही वेगळचं आहे. 

राफेल संदर्भात सध्या करण्यात आलेला करार हा दसॉल्ट एविएशन आणि रिलायन्स डिफेन्स लिमिटेड यांच्यात झाला आहे. तत्कालीन करार रद्द करुन उड्डाण स्थितीतील 36 राफेल जेट विमानांचा करार होण्यापूर्वीच काही दिवस म्हणजे एप्रिल 2015 मध्ये हा करार झाला. कार्पोरेट संदर्भातील भारत सरकारच्या मंत्रालयीन वेबसाईटवर रिलायन्स डिफेन्स लिमिटेडचे स्पष्टीकरण दिले आहे. त्यानुसार, या कंपनीचे मुंबईत नोंदणीकरण झाले असून 28 मार्च 2015 रोजी कंपनी सुरू करण्यात आली आहे. यावरुन रविशंकर प्रसाद आणि भाजपने केलेला दावा चुकीचा असल्याचे दिसून येत आहे.

टॅग्स :Relianceरिलायन्सRafale Dealराफेल डीलAnil Ambaniअनिल अंबानी