भाजपाच्या प्रचार साहित्याची ३० हजारांत विक्री!

By Admin | Updated: July 1, 2017 02:43 IST2017-07-01T02:43:50+5:302017-07-01T02:43:50+5:30

भाजपा सरकारने आतापर्यंत केलेल्या कामगिरीची माहिती देणारे ३ टन वजनाचे प्रचार साहित्य लोकांमध्ये वितरित न करता ते चक्क रद्दीत

BJP's propaganda material sells 30 thousand! | भाजपाच्या प्रचार साहित्याची ३० हजारांत विक्री!

भाजपाच्या प्रचार साहित्याची ३० हजारांत विक्री!

लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : भाजपा सरकारने आतापर्यंत केलेल्या कामगिरीची माहिती देणारे ३ टन वजनाचे प्रचार साहित्य लोकांमध्ये वितरित न करता ते चक्क रद्दीत विक्री झाल्याची माहिती शुक्रवारी उघडकीस आली. शेकडो योजनांची माहिती देणारी मासिके, पुस्तिका, पॉम्प्लेटस् व पंडित दीनदयाळ उपाध्याय यांचे पोस्टकार्ड आकाराच्या छायाचित्रांची अवघ्या ३० हजारांत विक्री करण्यात आली आहे. काही दिवसांपूूर्वी ही रद्दी खरेदी करण्यात आली. त्यासाठी भाजपाचे कार्यालय मंत्री (ग्रामीण) अमित चौधरी यांना १० हजार रोख व २० हजाराची रक्कम आॅनलाईन पेमेंटद्वारे खासगी अकाऊंटला ट्रान्स्फर केल्याचे मे. राज इंडस्ट्रीचे मालक राजेंद्र नाईक यांनी सांगितले.

Web Title: BJP's propaganda material sells 30 thousand!