शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
3
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
4
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
5
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
6
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
7
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
8
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
9
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
10
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
11
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
12
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
13
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
14
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
15
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
16
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
17
"...अन् कुंदन डोळे उघडतो", 'रांझणा'चा AI व्हिडिओ पाहिलात का? थिएटरमध्ये शिट्ट्यांचा कडकडाट
18
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
19
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
20
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार

भाजपच्या लोकप्रियतेची ५६ पोटनिवडणुकांतून परीक्षा; मध्यप्रदेश, गुजरात आदी ११ राज्यांत आज मतदान

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 3, 2020 05:09 IST

Voting today in 11 states like Madhya Pradesh, Gujarat : ज्या ५६ जागांसाठी पोटनिवडणूक होणार आहे त्यात मध्यप्रदेशातील २८ जागांचा समावेश आहे. या निकालांवर मध्यप्रदेश सरकारचे भवितव्य अवलंबून आहे.

नवी दिल्ली : भाजपप्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडी विरुद्ध राष्ट्रीय जनता दल यांच्यातील ‘काँटे की टक्कर’ यामुळे सगळ्या देशाचे लक्ष बिहारकडे लागलेले असले तरी तब्बल ५६ जागांवर पोटनिवडणुकीसाठी ११ राज्यांमध्ये मतदान होणार आहे. त्यातील ५४ जागांसाठी आज, मंगळवारी मतदान होत असून उर्वरित दोन जागा मणिपूरमधील असून त्यासाठी ७ नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे. ज्या ५६ जागांसाठी पोटनिवडणूक होणार आहे त्यात मध्यप्रदेशातील २८ जागांचा समावेश आहे. या निकालांवर मध्यप्रदेश सरकारचे भवितव्य अवलंबून आहे. त्यामुळे केंद्रातील सत्ताधारी भाजप आणि विरोधी पक्ष काँग्रेस या दोन्हींसाठी या पोटनिवडणुका प्रतिष्ठेचा मुद्दा बनल्या आहेत.ज्योतिरादित्य शिंदे यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत समर्थकांसह भारतीय जनता पक्षात प्रवेश केल्याने मध्यप्रदेशात २८ जागांसाठी पोटनिवडणुकीचा प्रचार सुरू आहे. २०१८ मध्ये झालेल्या मध्यप्रदेश विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला ११४, तर भाजपला १०९ जागांवर विजय मिळाला होता. २३० सदस्यांच्या मध्यप्रदेश विधानसभेत कोणालाही बहुमत मिळाले नाही; परंतु काँग्रेसने सत्ता स्थापन केली. त्यानंतर ज्योतिरादित्य शिंदे यांच्या भाजपप्रवेशामुळे काँग्रेसला सत्ता गमवावी लागली. या पार्श्वभूमीवर मध्यप्रदेशात पोटनिवणूक होत आहे. माजी मुख्यमंत्री कमलनाथ, विद्यमान मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान आणि ज्योतिरादित्य शिंदे यांचे भवितव्य या निवडणुकीत ठरणार आहे. याशिवाय गुजरातमध्ये आठ, उत्तर प्रदेशात सात, ओडिशा, नागालँड, कर्नाटक आणि झारखंड येथे प्रत्येकी दोन तर छत्तीसगढ, तेलंगणा आणि हरियाणा या राज्यांत प्रत्येकी एका जागेसाठी पोटनिवडणूक होत आहे. बिहारमधील वाल्मीकीनगर लोकसभा मतदारसंघातही पोटनिवडणूक होणार आहे. (वृत्तसंस्था)

टॅग्स :Madhya Pradeshमध्य प्रदेशGujaratगुजरातVotingमतदानBJPभाजपाcongressकाँग्रेस