शहरं
Join us  
Trending Stories
1
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
2
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
3
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
4
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
5
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
6
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
7
सलमानच्या Ex गर्लफ्रेंडचे आदित्य पांचोली यांच्यावर गंभीर आरोप, म्हणाली- "तुम्ही महिलांना फसवता, त्यांना मारहाण करता..."
8
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
9
पैशाच्या कारणावरून वाद, म्हाडा अधिकाऱ्याच्या पत्नीनं आयुष्यच संपवलं, अंधेरीतील घटना!
10
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई
11
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
12
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
13
कोट्यवधींचा व्यवसाय सोडून जपानी अब्जाधीश बनला शिवभक्त! एका रात्री स्वप्नात... आणि संपूर्ण आयुष्य बदललं
14
Mansa Devi Stampede: गुदमरून टाकणारी गर्दी, एक अफवा अन्...; चेंगराचेंगरीपूर्वीचा व्हिडीओ आला समोर 
15
अनुष्का शर्माचा 'चकदा एक्सप्रेस' झाला डबाबंद? सिनेमातील अभिनेत्यानेच दिली प्रतिक्रिया, म्हणाला...
16
Roshni Walia : "कधीकधी काही लोक...", वडिलांनी सोडली आईची साथ, नातेवाईकांनी दिला शाप, अभिनेत्री भावुक
17
मोहम्मद मुइझ्झूंचा चीनला धक्का; भारतासोबत मुक्त व्यापार करार करण्याची व्यक्त केली इच्छा...
18
श्रावण विनायक चतुर्थी: दूर्वागणपती व्रत का करतात? वाचा, बाप्पाला प्रिय अमृतासमान दुर्वा कथा
19
यापेक्षा चांगली संधी मिळणार नाही; ही कंपनी आपल्या कारवर देतेय १ लाख रुपयांची सूट

LokSabha Bypoll Results 2018 : भाजपासाठी पोटनिवडणुका ठरताहेत डोकेदुखी; चार वर्षांत जिंकल्या फक्त चार जागा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 31, 2018 15:39 IST

देशातल्या 11 राज्यांमध्ये चार लोकसभा आणि 10 विधानसभांच्या जागेसाठी पोटनिवडणूक घेण्यात आली. या पोटनिवडणुकांमध्ये भाजपाला फारशी चमक दाखवता आलेली नाही.

नवी दिल्ली- देशातल्या 11 राज्यांमध्ये चार लोकसभा आणि 10 विधानसभांच्या जागेसाठी पोटनिवडणूक घेण्यात आली. या पोटनिवडणुकांमध्ये भाजपाला फारशी चमक दाखवता आलेली नाही. गेल्या काही दिवसांपूर्वी पोटनिवडणुकांऐवजी राज्यातील निवडणुका जिंकणं महत्त्वाचं असल्याचं अमित म्हणाले होते. परंतु पोटनिवडणुकीतून सत्ताधारी पक्षाची ताकद दिसत असते. या वर्षी मार्च महिन्यात उत्तर प्रदेशातल्या पोटनिवडणुकांमध्येही भाजपाला मोठा धक्का बसला होता.मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा प्रभाग गोरखपूर आणि उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य यांच्या अलाहाबाद इथल्या फुलपूर लोकसभेच्या पोटनिवडणुकांमध्ये भाजपाला पराभवाचा सामना करावा लागला होता. भाजपाला बिहारच्या अररिया लोकसभा निवडणुकीतही पराभव स्वीकारावा लागला होता. या जागेवर आरजेडीला पुन्हा एकदा विजय मिळाला होता. 2014च्या लोकसभा निवडणुकीतल्या ऐतिहासिक विजयानंतर चार वर्षांत भाजपाच्या कामगिरी खालावत चालली आहे. भाजपाला 2014पासून मार्च 2014पर्यंत 23 लोकसभा निवडणुकीतल्या फक्त चार जागांवर विजय मिळवणं शक्य झालं आहे.2014पासून झालेल्या लोकसभा पोटनिवडणुकीत भाजपाला आतापर्यंत 5 जागांवर विजय मिळाला आहे. काँग्रेसनं अमृतसर लोकसभा निवडणुकीत भाजपाला टक्कर देत घवघवीत मतांनी विजय मिळवला होता. गेल्या चार वर्षांत झालेल्या पोटनिवडणुकांत इतर पक्षांच्या तुलनेत काँग्रेसला सर्वाधिक जागांवर विजय मिळाला आहे. काँग्रेसपाठोपाठ भाजपा आणि तृणमूल काँग्रेसचा नंबर लागतो. या दोन्ही पक्षांनी गेल्या चार वर्षांतील पोटनिवडणुकांत चार-चार जागांवर विजय मिळवला आहे. 2014पासून ज्या 23 लोकसभेच्या जागांवर पोटनिवडणुका घेण्यात आल्या, त्यातील 10 जागा भाजपाकडे आधीपासून होत्या. त्या 10 जागांपैकी 6 जागांवर भाजपाला पराभवाचा सामना करावा लागला होता. तर 4 जागांवर विजय मिळवणं भाजपाला शक्य झालं होतं.2015, 2017 आणि मार्च 2018मध्ये झालेल्या एकाही पोटनिवडणुकीत भाजपाला विजय मिळवता आलेला नव्हता. परंतु मे 2018मध्ये झालेल्या महाराष्ट्रातल्या पालघर पोटनिवडणुकीत भाजपानं विजय मिळवला आहे. भाजपानं बीड लोकसभा पोटनिवडणूक आणि गुजरातमधल्या वडोदराची जागा जिंकली होती. बीजेडीनं ओडिशातल्या कंधमालमधली जागा जिंकली होती. तर एसपीनं यूपीच्या मैनपुरी जागा स्वतःकडे ठेवली होती. टीआरएसनं आंध्र प्रदेशमधल्या मेढक जागेवर कब्जा मिळवला होता. 

टॅग्स :Palghar bypoll 2018पालघर पोटनिवडणूक 2018PoliticsराजकारणElectionनिवडणूकBJPभाजपा