शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
5
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
6
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
7
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
8
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
9
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
10
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
11
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
12
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
13
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
14
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
15
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
16
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
17
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
18
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
19
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

गुजरातमधील भाजपाचे पॅनल तयार, दोन खासदार नाही लढणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 22, 2019 05:04 IST

आगामी लोकसभा निवडणुकीसाठी गुजरात भाजपा संसदीय मंडळाची बैठक होऊन त्यामध्ये राज्यांतील २५ जागांसाठीच्या भाजपा उमेदवारांची यादी निश्चित करण्यात आली आहे.

अहमदाबाद - आगामी लोकसभा निवडणुकीसाठी गुजरात भाजपा संसदीय मंडळाची बैठक होऊन त्यामध्ये राज्यांतील २५ जागांसाठीच्या भाजपा उमेदवारांची यादी निश्चित करण्यात आली आहे. ही यादी पक्षाच्या केंद्रीय निवडणूक समितीला पाठविण्यात येणार असून, त्यामधून अंतिम उमेदवार निवडले जाणार आहेत.  गुजरात भाजपा संसदीय मंडळाची तीन दिवस सलग बैठक झाली. या बैठकीत राज्यातील सर्व २६ लोकसभा मतदारसंघातील इच्छुकांबाबत चर्चा झाली. यापैकी प्रत्येक मतदारसंघातून २ ते ४ उमेदवारांची यादी निश्चित झाली आहे. ही यादी राज्यातील नेते दिल्लीला जाऊन पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांना सोपविणार आहेत. यातून अंतिम उमेदवारी भाजपाची केंद्रीय निवडणूक समिती जाहीर करेल. या बैठकीला मुख्यमंत्री विजय रुपाणी, पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जितू वाघानी व गुजरात प्रभारी ओम माथूर यांच्यासह मंडळाचे अन्य सदस्य उपस्थित होते.गांधीनगर मतदारसंघाबाबत मंडळाने नावे दिली नसून तो निर्णय केंद्रीय नेतृत्वावर सोपविला आहे. १९९१ पासून येथून ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी साततत्याने निवडून आले. या जागेवर कोणीतरी केंद्रीय नेत्याने निवडणूक लढवावी, अशी इच्छा अनेकांनी व्यक्त केली होती. त्यानुसार पक्षाने आता येथून भाजपाचे राष्टÑीय अध्यक्ष अमित शाह यांना उमेदवारी देऊन अडवाणी यांना रिटायर्ड केले आहे. पक्षाचे दोन विद्यमान खासदार लीलाधर वाघेला (पाटण) व विठ्ठल राराडिया (पोरबंदर) यांनी याआधीच प्रकृतीच्या कारणाने निवडणूक लढविणार नसल्याचे जाहीर केले आहे.कॉँग्रेसने घेतली आघाडी; चार उमेदवार जाहीरसन २०१४च्या लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपाने गुजरातमधील सर्व जागा जिंकल्या होत्या. त्यामुळे या राज्याबाबत कॉँग्रेस अतिशय सावध आहे. कॉँग्रेसने या राज्यातील चार उमेदवारांची नावे जाहीर करून प्रतिस्पर्ध्यावर आघाडी घेतली आहे. कॉँग्रेसने राज्यातील अहमदाबाद (पश्चिम) येथून राजू परमार, आणंदमधून भारतसिंह सोळंकी, वडोदरातून प्रशांत पटेल आणि छोटा उदेपूर येथून रणजित राठवा या उमेदवारांच्या नावांची घोषणा केली आहे. त्याचप्रमाणे गुजरातमध्ये कॉँग्रेस कार्यकारी समितीच्या बैठकीनंतर झालेल्या जाहीर सभेत काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी आणि सरचिटणीस प्रियंका गांधी यांची भाषणे झाली होती. यानिमित्ताने काँग्रेसने आपल्या या राज्यातील प्रचाराचा शुभारंभही केला आहे.

टॅग्स :BJPभाजपाLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक