भाजपाच्या कमळात नितीश कुमारांनी भरला रंग

By Admin | Updated: February 5, 2017 15:04 IST2017-02-05T15:03:43+5:302017-02-05T15:04:09+5:30

नितीश कुमार भाजपावर टोकाची टीका करत असले तरी त्यांचं भाजपा प्रेम उघड झालं आहे.

BJP's Nitish Kumar filled the lotus with colors filled with colors | भाजपाच्या कमळात नितीश कुमारांनी भरला रंग

भाजपाच्या कमळात नितीश कुमारांनी भरला रंग

ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 5 - एकेकाळी भाजपाचे मित्र राहिलेले नितीश कुमार भाजपापासून अजूनही दुरावले नसल्याचं चित्र समोर आलं आहे. नितीश कुमार भाजपावर टोकाची टीका करत असले तरी त्यांचं भाजपा प्रेम उघड झालं आहे. एका कार्यक्रमात नितीश कुमार यांनी एका चित्रकाराने काढलेल्या कमळाच्या चित्रात रंग भरतानाचं चित्र सोशल मीडियावर व्हायरल झालं आहे.

पाटणा येथील गांधी मैदानात २३ व्या पुस्तक प्रदर्शनाच्या कार्यक्रमात बुधवारी नितीश कुमार यांच्यातील चित्रकार सर्वांसमोर आला. मात्र यात अनेकांना राजकीय रंग दिसू लागले आहेत. भाजपाचे खासदार गिरीराज सिंग यांनी नितीश कुमार यांच्यावर प्रतिक्रिया देताना ते स्वत:ची महत्त्वाकांक्षा दाखवत असल्याचं म्हटलं आहे. बहुधा लालूप्रसाद यादव यांना मी स्वतंत्र आहे, असा संदेश द्यायचा असावा, असे ते म्हणाले. रामविलास पासवान यांनी नितीश कुमार यांना एनडीएमध्ये सहभागी होण्याचे आमंत्रण ही दिले होते.

Web Title: BJP's Nitish Kumar filled the lotus with colors filled with colors

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.