उत्तर प्रदेशमधील पालिका निवडणुकीसाठी झालेल्या मतदानाची मतमोजणी आज सुरू आहे. सकाळी आठ वाजल्यापासून सुरू झालेल्या या मतमोजणींच्या आतापर्यंतच्या कलांमध्ये भाजपाने मुसंडी मारली आहे. तर काँग्रेस पक्ष काहीसा पिछाडीवर दिसत आहे. उत्तराखंडमधील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी २३ जानेवारी रोजी सुमारे ६६ टक्के मतदान झालं होतं.
आतापर्यंत समोर आलेल्या कलांनुसार राज्यामधील ११ महानगरपालिकांच्या मतमोजणीत एका ठिकाणी भाजपा आणि एका ठिकाणी काँग्रेसने आघाडी घेतली आहे. तर राज्यातील ४६ नगरपालिकांपैकी भाजपाने पाच ठिकाणी आघाडी घेतली आहे, तर एका ठिकाणी विजय मिळवला आहे. तर काँग्रेसने ३ ठिकाणी आघाडी घेतली आहे. अपक्षांनी २ ठिकाणी आघाडी घेतली आहे. तर एका ठिकाणी विजय मिळवला आहे. तर ४३ नगरपंचायतींच्या मतमोजणीमध्ये अपक्ष २ ठिकाणी आघाडीवर आहेत. तर भाजपाने ३ ठिकाणी आघाडी मिळवली आहे. तर २ ठिकाणी विजय मिळवला आहे.
उत्तराखंडमधील ११ महापालिका, ४६ नगरपालिका आणि ४३ नगरपंचायतींमध्ये एकूण १२८२ वॉर्ड आहेत. त्यात अपक्ष ७० ठिकाणी आघाडीवर आहेत. तर ४७ ठिकाणी विजयी झाले आहेत. भाजपा ७५ ठिकाणी आघाडीवर आहे, तर २१ ठिकाणी विजय मिळवला आहे. तर काँग्रेसने १० ठिकाणी आघाडी घेतली आहे. तर २ ठिकाणी विजय मिळवला आहे.