भाजपा सर्वात जास्त देशविरोधी - अरविंद केजरीवाल

By Admin | Updated: March 16, 2016 13:07 IST2016-03-16T13:07:16+5:302016-03-16T13:07:16+5:30

भारतीय जनता पक्ष सर्वांपेक्षा जास्त देशविरोधी असल्याचं दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी म्हंटल आहे

BJP's most anti-India - Arvind Kejriwal | भाजपा सर्वात जास्त देशविरोधी - अरविंद केजरीवाल

भाजपा सर्वात जास्त देशविरोधी - अरविंद केजरीवाल

ऑनलाइन लोकमत - 
नवी दिल्ली, दि. १६ - भारतीय जनता पक्ष सर्वांपेक्षा जास्त देशविरोधी असल्याचं दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी म्हंटल आहे. जवाहलाल नेहरु विद्यापीठात (जेएनयू) ज्यांनी देशविरोधी घोषणा दिल्या त्यांना भाजपा वाचवत असल्याचा आरोपही केजरीवाल यांनी केला आहे. 
'भाजपा सर्वात जास्त देशविरोधी आहे. ज्यांनी देशविरोधी घोषणा दिल्या त्यांना भाजपा का वाचवत आहे ?', असा सवाल केजरीवाल यांनी ट्विटवरुन विचारला आहे. जेएनयू विद्यापीठाच्या चौकशी समितीने दिलेल्या अहवालानंतर केजरीवालांनी ही टीका केली आहे. जेएनयू चौकशी समितीने दिलेल्या अहवालात विद्यापीठातील विद्यार्थ्यांनी या घोषणा दिल्या नसून बाहेरुन आलेल्या काहीजणांनी या घोषणा दिल्याचं सांगितलं आहे. 
 

Web Title: BJP's most anti-India - Arvind Kejriwal