शहरं
Join us  
Trending Stories
1
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
2
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
3
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
4
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
5
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
6
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
7
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
8
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
9
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
10
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
11
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
12
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
13
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
14
अबतक ४००! चेपॉकच्या घरच्या मैदानात MS धोनीच्या नावे झाला खास रेकॉर्ड
15
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
16
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
17
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
18
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...
19
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर
20
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी

गुजरातमध्ये भाजपाचा नैतिक पराभवच - ममता बॅनर्जी

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 18, 2017 22:27 IST

गुजरातमध्ये भारतीय जनता पार्टीने (भाजपा) सलग सहाव्यांदा सत्ता राखली असली, तरी सुद्धा यंदाच्या निवडणुकीत भाजपाला जास्त जागा मिळवता आल्या नाहीत. त्यामुळे हा एकप्रकारे भाजपाचा नैतिक पराभवच आहे अशी टीका पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केली. त्यांनी ट्विटरच्या माध्यमातून भाजपावर निशाना साधला. 

ठळक मुद्देसहाव्यांदा सत्ता राखण्यात भाजपला यश गुजरातमधील मतदारांनी संतुलित निकाल दिलाभाजपाचा नैतिक पराभवच आहे

कोलकाता : गुजरातमध्ये भारतीय जनता पार्टीने (भाजपा) सलग सहाव्यांदा सत्ता राखली असली, तरी सुद्धा यंदाच्या निवडणुकीत भाजपाला जास्त जागा मिळवता आल्या नाहीत. त्यामुळे हा एकप्रकारे भाजपाचा नैतिक पराभवच आहे अशी टीका पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केली. त्यांनी ट्विटरच्या माध्यमातून भाजपावर निशाना साधला. ट्विटरवर ममता बॅनर्जी म्हणाल्या,  गुजरातमधील मतदारांनी संतुलित निकाल दिला आहे, त्याबद्दल त्यांचे अभिनंदन! हा विजय तात्पुरता आणि कसाबसा मिळविलेला असून हा भाजपाचा नैतिक पराभवच आहे. गुजरातच्या जनतेने दडपशाही, अस्थिरता आणि सर्वसामान्य जनतेवर होणाऱ्या अन्यायाविरोधात मतदान केले आहे, अशी प्रतिक्रिया ममता बॅनर्जी यांनी गुजरात विधानसभा निवडणुकीच्या निकालावर दिली. याचबरोबर, गुजरातच्या मतदारांनी 2019 च्या निवडणुकीसाठी मांजराच्या गळ्यात घंटा बांधली आहे, असेही त्या यावेळी म्हणाल्या. 

 दरम्यान, गुजरात हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे राज्य असल्याने त्यांच्यासाठी गुजरातची निवडणूक प्रतिष्ठेची  तर काँग्रेसचे नवे अध्यक्ष राहुल गांधी यांच्या नेतृत्वाची ही कसोटी समजली जात होती. मात्र, गुजरातच्या जनतेने भाजपाच्याच हातात सलग सहाव्यांदा सत्ता दिली. आज मतमोजणीला सुरुवात झाल्यावर सुरुवातीच्या एका तासामधील कलांमध्ये काँग्रेसने मिळवलेली आघाडी मोडून काढत भाजपाने बहुमताचा आकडा गाठला आहे. जाहीर निकालांमध्ये भाजपाने  एकूण 99 जागांवर विजय मिळवला तर काँग्रेसने 80 जागा जिंकल्या. इतर उमेदवार तीन ठिकाणी विजयी झाले. तर, दुसरीकडे हिमाचल प्रदेशमध्ये सुद्धा भाजपाने कॉंग्रेसची सत्ता मोडीत काढत कमळ फुलविले आहे . हिमाचल विधानसभेच्या 68 जागांसाठी झालेल्या निवडणुकीत भाजपाने 44 आणि काँग्रेस 21 जागा मिळविल्या आहेत. तर इतर पक्षाला तीन जागा मिळाल्या आहेत.  

टॅग्स :Gujarat Election 2017गुजरात निवडणूक 2017Mamata Banerjeeममता बॅनर्जीBJPभाजपाHimachal Pradesh Assembly Election Results 2017हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणूक निकाल 2017