भाजपची केजरीवालांवर प्रश्नांची सरबत्ती !
By Admin | Updated: January 29, 2015 16:34 IST2015-01-29T16:34:28+5:302015-01-29T16:34:28+5:30
अरविंद केजरीवाल यांना रोखण्यासाठी भाजपने रणनिती बनवली असून केजरीवाल यांच्यावर रोज ५ प्रश्नांची सरबत्ती करण्याचे ठरवले आहे.

भाजपची केजरीवालांवर प्रश्नांची सरबत्ती !
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. २९ - दिल्ली विधानसभा निवडणुकीत भाजपविरुध्द आम आदमी पार्टी यांच्यात काट्यांची लढत होईल असे संकेत काही वृत्तवाहिन्यांच्या सर्वेमध्ये उघड झाल्याने भाजप सरसावली आहे. अरविंद केजरीवाल यांना रोखण्यासाठी भाजपने रणनिती बनवली असून केजरीवाल यांच्यावर रोज ५ प्रश्नांची सरबत्ती करण्याचे ठरवले आहे. गुरुवारी घेण्यात आलेल्या एका पत्रकार परिषदेत भाजपने याची माहिती दिली.
काँग्रेसचा पाठिंबा घेणार नसल्याचे आश्वासन पाळले का ?
शीला दीक्षित यांच्याविरुध्दचा तपास केला का नाही?
मी आम आदमी आहे असं सांगणा-या केजरीवालांनी झेड प्लस सुरक्षा का स्वीकारली?
शपथेवेळी मेट्रोमधून जाणा-या केजरीवालांनी सरकारी काम मोठया गाडयातून का केले?
खासगी विमानातून प्रवास तत्वात बसत नाही असं सांगणा-यांनी स्व:त प्रवास का केला?
यासारख्या प्रश्नांची सरबत्ती करत भाजपने केजरीवाल यांच्याकडे उत्तर मागितले आहे. भाजप रोज एका पत्रकार परिषदेत केजरीवाल यांना ५ प्रश्न विचारणार आहेत. केजरीवाल यांनी काँग्रेस व भाजपशासीत राज्यात अशाच प्रश्नांची सरबत्ती करीत सरकारला वेठीस धरण्याचे व त्यांच्याविरुध्द आंदोलन करण्याचे काम केले आहे. दिल्ली विधानसभा निवडणुकीत केजरीवाल यांना चारी बाजुनी चित्तपट करण्यासाठी भाजपने आपली पूर्ण शक्ती लावायला सुरुवात केली. याचाच एक भाग म्हणून दिल्ली विधानसभा निवडणुकीत भाजपचे विविध राज्यातील जवळपास १२० खासदार दिल्लीत तळ ठोकून बसणार असून प्रचारांमध्ये सहभाग घेणार आहेत.