भाजपाच्या हरियाणा प्रदेशाध्यक्षाच्या मुलाला अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 5, 2017 23:46 IST2017-08-05T23:46:33+5:302017-08-05T23:46:36+5:30

हरियाणाचे भाजप प्रदेशाध्यक्ष सुभाष बराला यांचा मुलगा विकास बराला यास एका मुलीचा पाठलाग व छेडछाड केल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे.

BJP's Haryana state president arrested | भाजपाच्या हरियाणा प्रदेशाध्यक्षाच्या मुलाला अटक

भाजपाच्या हरियाणा प्रदेशाध्यक्षाच्या मुलाला अटक

चंदीगड : हरियाणाचे भाजप प्रदेशाध्यक्ष सुभाष बराला यांचा मुलगा विकास बराला यास एका मुलीचा पाठलाग व छेडछाड केल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे.
प्रदेशाध्यक्षांचा मुलगा कायद्याचा विद्यार्थी आहे. पीडित मुलगी आयएएस अधिकाºयाची मुलगी आहे. शुक्रवारी चंदीगडमधील सेक्टर ९ येथून चालली होती. तेव्हा एक टाटा सफारी कार पाठलाग करीत आहे, असे तिच्या लक्षात आले. तिने तातडीने पोलीस नियंत्रण कक्षाला फोन केला. पोलिसांनी दोघांना अटक केली, तेव्हा ते दोघेही दारूच्या नशेमध्ये होते. (वृत्तसंस्था)

Web Title: BJP's Haryana state president arrested