शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काका-काकूंचे घर! ऐन मतदानाच्या दिवशीच अजित पवारांच्या घरी का गेला? सुप्रिया सुळेंनी सांगितले कारण
2
मुस्लिमांना पूर्ण आरक्षण मिळायलाच हवे; लालू प्रसाद यादव यांचं मोठं विधान
3
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : देशभरात ११ वाजेपर्यंत २४ टक्के मतदान; महाराष्ट्रात प्रमाण सर्वात कमी
4
Video - "आमचा उमेदवार चोरीला गेला..."; माजी मंत्र्यांनी जनतेला केलं 'हे' आवाहन
5
बारामतीत नवा ट्विस्ट..! ऐन मतदानाच्या दिवशी सुप्रिया सुळे अजित पवारांच्या घरी दाखल
6
मतदानादरम्यान, किरण सामंत नॉट रिचेबल, कार्यकर्ते संभ्रमात, रत्नागिरी-सिंधुदुर्गमध्ये मोठा ट्विस्ट
7
"मराठी 'not welcome' म्हणणाऱ्यांना मत देऊ नका", गुजराती HRच्या पोस्टनंतर रेणुका शहाणेंचं ट्वीट
8
ना पत्नी, ना मुलबाळ! सलमान खानच्या पश्चात कोण होणार त्याच्या संपत्तीचा वारसदार? नाव आलं समोर
9
Baramati Lok Sabha Election 2024 : 'ही चिडचिड खूप काही सांगून जाते...', रोहित पवारांनी दत्तात्रय भरणेंचा व्हिडीओ केला शेअर, म्हणाले...
10
‘रामगोपाल यादव यांचा राम मंदिराबाबत वादग्रस्त दावा, म्हणाले, हे मंदिर बेकार, त्याचा…’
11
अक्षय्य तृतीया का साजरी केली जाते? या दिवसाचे महत्त्व, महात्म्य अन् काही मान्यता जाणून घ्या
12
Akhilesh Yadav : "भाजपावाले जाणूनबुजून उन्हाळ्यात मतदान ठेवतात"; अखिलेश यादव यांचा आरोप
13
महाराष्ट्राची लढाई बारामतीत होते की काय? संजय राऊतांची मोदी-शाह यांच्यावर टीका
14
सांगली जिल्हा विशाल पाटील यांच्या घरासाठी जन्माला आलेला नाही; संजयकाका पाटलांचा हल्लाबोल
15
झारखंडचे मंत्री आलमगीर यांचे स्वीय सहायक आणि नोकराला ईडीने केली अटक; 35 कोटी जप्त
16
अक्षय्य तृतीया: ‘ही’ कामे अवश्य करा, सुख-समृद्धी मिळवा; लक्ष्मीकृपेने भरभराट, धनलाभ योग!
17
"इंग्रजांनी उभारलेल्या व्यवस्थेला गंज लागलाय..," UPSCचा उल्लेख करत माजी RBI गव्हर्नरांनी उपस्थित केला प्रश्न
18
लेकीसाठी शरद पवार बनले बारामतीचे मतदार; मुंबईच्या मतदार यादीतून नाव काढलं
19
अजबच! गणितात २०० पैकी २१२, तर भाषेमध्ये २११ गुण, मुलीचं प्रगती पुस्तक होतंय व्हायरल  
20
Video - हृदयस्पर्शी! वडिलांच्या मृत्यूनंतर सोडून गेली आई; 10 वर्षांचा मुलगा चालवतोय घर

मिशन बंगालसाठी भाजपची मोठी तयारी, 'या' 5 नेत्यांवर असेल बंगाल जिंकण्याची जबाबदारी

By श्रीकृष्ण अंकुश | Published: November 18, 2020 11:10 AM

गेल्या निवडणुकीत ममतांच्या टीएमसीने सर्वाधिक 211 जागांवर विजय मिळवला होता. तर काँग्रेसला 44, डाव्यांना 26 तर भाजपला केवळ 3 जागाच जिंकल्या आल्या होत्या आणि इतरांना 10 जागा मिळाल्या होत्या. येथे बहुमतासाठी एकूण 148 जागांची आवश्यकता आहे.

ठळक मुद्देबिहार विजयानंतर, आता भाजप मिशन बंगालसाठी कंबर कसून तयारीला लागला आहे.बंगाल निवडणूक जिंकण्यासाठी भाजपने पाच बड्या नेत्यांवर मोठी जबाबदारी टाकली आहे. बंगाल निवडणुकीसाठी भाजपने पाच विभाग (झोन) तयार केले आहेत

कोलकाता - बिहार विजयानंतर, आता भाजप मिशन बंगालसाठी कंबर कसून तयारीला लागला आहे. बंगाल निवडणूक जिंकण्यासाठी भाजपने पाच बड्या नेत्यांवर मोठी जबाबदारी टाकली आहे. बंगाल निवडणुकीसाठी भाजपने पाच विभाग (झोन) तयार केले आहेत आणि पाच मोठ्या नेत्यांना या विभागांची जबाबदारी दिली आहे. हे पाच नेते या विभागाचे प्रमुख असतील.

कुणाकडे असेल कोणत्या विभागाची जबाबदारी? -भाजपने आखलेल्या रणनितीनुसार, सुनील देवधर यांच्याकडे हावडा, हुगळी आणि मिदनापूर या विभागांची जबाबदारी असेल. विनोद तावडे हे नाबादीपमध्ये निवडणुकीची तयारी करतील. विनोद सोनकर बर्दमान आणि हरीश द्विवेदी यांना उत्तर बंगालची जबाबदारी देण्यात आली आहे. हे चारही नेते भाजपचे राष्ट्रीय सचिव आहेत. याशिवाय भाजपचे राष्ट्रीय महासचिव दुष्यंत गौतम यांना कोलकाता विभागाचे निवडणूक प्रभारी करण्यात आले आहे. हे पाचही नेते नोव्हेंबरच्या अखेरपर्यंत निवडणुकीच्या तयारीवर अहवाल सादर करून भाजप अध्यक्ष जेपी नड्डा यांना सादर करतील. या अहवालानंतर गृह मंत्री अमित शाह हे बंगालचा दौरा करण्याची शक्यता आहे.

हे आहेत प्रभारी आणि सह प्रभारी -पश्चिम बंगालचे प्रभारी कैलाश विजयवर्गीय हेच असतील. तर बीजेपी अध्यक्ष नड्डा यांनी, आयटी सेलचे अमित मालवीय यांना बंगालचे सह प्रभारी म्हणून नियुक्त केले आहे. पश्चिम बंगालमध्ये पुढील वर्षी विधानसभा निवडणुका आहेत. सध्या येथे तृणमूल काँग्रेसचे सरकार असून ममता बॅनर्जी या राज्याच्या मुख्यमंत्री आहेत.

असे आहे सध्याचे राजकीय बलाबल -गेल्या निवडणुकीत ममतांच्या टीएमसीने सर्वाधिक 211 जागांवर विजय मिळवला होता. तर काँग्रेसला 44, डाव्यांना 26 तर भाजपला केवळ 3 जागाच जिंकल्या आल्या होत्या आणि इतरांना 10 जागा मिळाल्या होत्या. येथे बहुमतासाठी एकूण 148 जागांची आवश्यकता आहे.

राज्यपाल बंगालच्या दौऱ्यावर - पश्चिम बंगालचे राज्यपाल जगदीप धनखड हे उत्तर बंगालच्या एक महिन्याच्या दौऱ्यावर आहेत. पश्चिम बंगालमध्ये पोलीस आणि नोकरशाहांचे राजकारण केले जात आहे. असा आरोपही धनखड यांनी केला आहे. एवढेच नाही, तर यासंदर्भात त्यांनी पत्रही लिहिले आहे.

टॅग्स :BJPभाजपाwest bengalपश्चिम बंगालNarendra Modiनरेंद्र मोदीMamata Banerjeeममता बॅनर्जीElectionनिवडणूक