मिशन बंगालसाठी भाजपची मोठी तयारी, 'या' 5 नेत्यांवर असेल बंगाल जिंकण्याची जबाबदारी

By श्रीकृष्ण अंकुश | Published: November 18, 2020 11:10 AM2020-11-18T11:10:29+5:302020-11-18T11:19:48+5:30

गेल्या निवडणुकीत ममतांच्या टीएमसीने सर्वाधिक 211 जागांवर विजय मिळवला होता. तर काँग्रेसला 44, डाव्यांना 26 तर भाजपला केवळ 3 जागाच जिंकल्या आल्या होत्या आणि इतरांना 10 जागा मिळाल्या होत्या. येथे बहुमतासाठी एकूण 148 जागांची आवश्यकता आहे.

BJPs great preparation for Mission west Bengal gave responsibility to five leaders to win | मिशन बंगालसाठी भाजपची मोठी तयारी, 'या' 5 नेत्यांवर असेल बंगाल जिंकण्याची जबाबदारी

मिशन बंगालसाठी भाजपची मोठी तयारी, 'या' 5 नेत्यांवर असेल बंगाल जिंकण्याची जबाबदारी

Next
ठळक मुद्देबिहार विजयानंतर, आता भाजप मिशन बंगालसाठी कंबर कसून तयारीला लागला आहे.बंगाल निवडणूक जिंकण्यासाठी भाजपने पाच बड्या नेत्यांवर मोठी जबाबदारी टाकली आहे. बंगाल निवडणुकीसाठी भाजपने पाच विभाग (झोन) तयार केले आहेत

कोलकाता - बिहार विजयानंतर, आता भाजप मिशन बंगालसाठी कंबर कसून तयारीला लागला आहे. बंगाल निवडणूक जिंकण्यासाठी भाजपने पाच बड्या नेत्यांवर मोठी जबाबदारी टाकली आहे. बंगाल निवडणुकीसाठी भाजपने पाच विभाग (झोन) तयार केले आहेत आणि पाच मोठ्या नेत्यांना या विभागांची जबाबदारी दिली आहे. हे पाच नेते या विभागाचे प्रमुख असतील.

कुणाकडे असेल कोणत्या विभागाची जबाबदारी? -
भाजपने आखलेल्या रणनितीनुसार, सुनील देवधर यांच्याकडे हावडा, हुगळी आणि मिदनापूर या विभागांची जबाबदारी असेल. विनोद तावडे हे नाबादीपमध्ये निवडणुकीची तयारी करतील. विनोद सोनकर बर्दमान आणि हरीश द्विवेदी यांना उत्तर बंगालची जबाबदारी देण्यात आली आहे. हे चारही नेते भाजपचे राष्ट्रीय सचिव आहेत. याशिवाय भाजपचे राष्ट्रीय महासचिव दुष्यंत गौतम यांना कोलकाता विभागाचे निवडणूक प्रभारी करण्यात आले आहे. हे पाचही नेते नोव्हेंबरच्या अखेरपर्यंत निवडणुकीच्या तयारीवर अहवाल सादर करून भाजप अध्यक्ष जेपी नड्डा यांना सादर करतील. या अहवालानंतर गृह मंत्री अमित शाह हे बंगालचा दौरा करण्याची शक्यता आहे.

हे आहेत प्रभारी आणि सह प्रभारी -
पश्चिम बंगालचे प्रभारी कैलाश विजयवर्गीय हेच असतील. तर बीजेपी अध्यक्ष नड्डा यांनी, आयटी सेलचे अमित मालवीय यांना बंगालचे सह प्रभारी म्हणून नियुक्त केले आहे. पश्चिम बंगालमध्ये पुढील वर्षी विधानसभा निवडणुका आहेत. सध्या येथे तृणमूल काँग्रेसचे सरकार असून ममता बॅनर्जी या राज्याच्या मुख्यमंत्री आहेत.

असे आहे सध्याचे राजकीय बलाबल -
गेल्या निवडणुकीत ममतांच्या टीएमसीने सर्वाधिक 211 जागांवर विजय मिळवला होता. तर काँग्रेसला 44, डाव्यांना 26 तर भाजपला केवळ 3 जागाच जिंकल्या आल्या होत्या आणि इतरांना 10 जागा मिळाल्या होत्या. येथे बहुमतासाठी एकूण 148 जागांची आवश्यकता आहे.

राज्यपाल बंगालच्या दौऱ्यावर - 
पश्चिम बंगालचे राज्यपाल जगदीप धनखड हे उत्तर बंगालच्या एक महिन्याच्या दौऱ्यावर आहेत. पश्चिम बंगालमध्ये पोलीस आणि नोकरशाहांचे राजकारण केले जात आहे. असा आरोपही धनखड यांनी केला आहे. एवढेच नाही, तर यासंदर्भात त्यांनी पत्रही लिहिले आहे.

Web Title: BJPs great preparation for Mission west Bengal gave responsibility to five leaders to win

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.