शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

पंजाबमध्ये भाजपची चांगली कामगिरी - हरदीप पुरी

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2022 11:16 IST

भाजपच्या वतीने पंजाब विधानसभा निवडणुकीच्या पर्यवेक्षणाची अतिरिक्त जबाबदारी सध्या पेट्रोलियम आणि नगरविकास आणि गृहनिर्माण कामकाज खात्याचे मंत्री हरदीप पुरी यांच्याकडे आहे. ‘लोकमत’चे नॅशनल एडिटर हरीश गुप्ता यांनी त्यांची घेतलेली मुलाखत.

हरीश गुप्ता, ‘लोकमत’चे नॅशनल एडिटर -

भाजपच्या वतीने पंजाब विधानसभा निवडणुकीच्या पर्यवेक्षणाची अतिरिक्त जबाबदारी सध्या पेट्रोलियम आणि नगरविकास आणि गृहनिर्माण कामकाज खात्याचे मंत्री हरदीप पुरी (Hardeep Puri) यांच्याकडे आहे. ‘लोकमत’चे नॅशनल एडिटर हरीश गुप्ता यांनी त्यांची घेतलेली मुलाखत.

पंजाबला तुम्ही वारंवार भेट देता. अकाली भाजपपासून  दुरावल्यानंतर आता तुमचा पक्ष भाजपचा प्रवास कसा आहे?- ते प्रकरण आता मागे पडले. पंजाबच्या तुकडीचा सदस्य असण्याची जबाबदारी पक्षाने मला आता दिली आहे. भाजप खूपच चांगली कामगिरी करीत असल्याचे मी तुम्हाला सांगू शकतो.तुमचा पक्ष शर्यतीतही नाही, असे सगळ्या मतदान चाचण्या सांगत असताना तुमच्या विधानाचा आधार कोणता?- या मतदान चाचण्या कशा असतात, हे तुम्हाला माहीत आहे. राज्यांमागून राज्यात त्या भरकटल्या आहेत.भाजप किती जागा जिंकणार?- जनतेला बदल हवा आहे. काँग्रेस आत्मघाती मार्गावर आहे. मी भाजपबद्दल बोलतोय. ११७ सदस्यांच्या विधानसभेत भाजप हा सर्वात मोठा पक्ष असेल.तुम्ही कॅप्टन अमरिंदर सिंग आणि एस. एस. धिंडसा यांच्यासोबत युती करून ६५ जागा लढवत आहात आणि तुम्ही म्हणता की, भाजप हा सर्वात मोठा पक्ष असेल.- अमरिंदर सिंग यांच्या पक्षाच्या ८ उमेदवारांसह आम्ही ७३ जागा भाजपच्या चिन्हावर लढवत आहोत. भाजप हा हिंदूंचा पक्ष असल्याचे समजण्याचे दिवस आणि तो २३ जागांवर मर्यादित राहिल्याचे दिवस आता नाहीत. तुमच्या आघाडीला स्पष्ट बहुमत मिळेल?- शब्दांचा खेळ करणारा मी नाही. आज पंजाब त्रिशंकू विधानसभेकडे वाटचाल करीत आहे. परंतु, हे दृश्य मोदीजींनी प्रचार सुरू करताच बदलून जाईल. भाजप जागा जिंकणार त्या किती?- आम्हाला पंजाबमध्ये स्वबळावर ३० जागांची अपेक्षा आहे. राष्ट्रीय लोकशाही आघाडी ४०-४५ जागांपर्यंत जाऊ शकेल. निवडणुकीनंतर अकालींसोबत युती होणार नाही?- अजिबात नाही. ४० वर्षांत आम्ही युतीमध्ये विस्तार करण्यात अपयशी ठरलो. आता आम्ही चालकाच्या जागी आहोत.तुमचा मुख्यमंत्रिपदाचा चेहरा कोण?- आमदार ठरवतील आणि पक्षश्रेष्ठी निकालानंतर निर्णय घेतील.तरी तुम्ही किती जागा जिंकणार?- मी तुम्हाला खात्रीने सांगतो की, काँग्रेस प्रत्यक्षात प्रभाव गमावणार असून लोकांनी तर अकालींना निरुपयोगी म्हणून टाकून दिले आहे. जमीन, वाळू आणि अमली पदार्थांचे माफियांनी राज्याला नष्ट केले असून, लोक त्या दोघांबद्दलही निराश झाले आहेत. आम आदमी पक्षाबद्दल काही चांगले न बोललेले बरे.  

टॅग्स :Punjab Assembly Election 2022पंजाब विधानसभा निवडणूक २०२२BJPभाजपा