शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai: कबुतरांना खायला घातलं, वांद्र्यात एका महिलेसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल!
2
उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार
3
सूर्यकुमार यादवने पाकिस्तानच्या जखमेवर चोळलं मीठ, सुपर ४ मधील लढतीबाबत म्हणाला...
4
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
5
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
6
पाक-सौदीसोबत आता इतर अरब राष्ट्रेही एकत्र? पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांचा दावा
7
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज
8
‘निवडणूक आयोग जागा राहिला, चोरी पाहत राहिला...’, राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
9
राज्यात पीक पेरा नोंदणी ४७ टक्केच नोंदणीस दुसऱ्यांदा ३० पर्यंत मुदतवाढ
10
अमेरिकेत टिकटॉकचं गौडबंगाल! डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकच्या बाबतीतही आता आपला निर्णय फिरवला
11
बदलापूरसारखी दुसरी घटना घडण्याची वाट बघताय का?; हायकोर्टाचा संतप्त सवाल
12
आधी जिल्हा परिषद निवडणुकांचा बार! याचिका निकाली निघाल्याने मार्ग जवळपास मोकळा
13
आयोग नव्हे, मतदारच राजा !
14
विमानतळासह एरोसिटीला जोडणाऱ्या कॉरिडॉरला मंजुरी; केंद्राच्या निर्णयाने सिडकोस दिलासा, तीन किमीच्या मार्गासाठी ४४.४८ कोटींचा खर्च
15
चौथ्या मजल्यावरून पडून चिमुकला वाचला; पण कोंडीत जीव गेला
16
मते चोरी हाेणार नाहीत, याची काळजी घ्या; राज ठाकरे यांच्या सूचना
17
सिडकोच्या कंपनीतील कामगारांचा ४० वर्षे प्रलंबित प्रश्न अखेर सुटला; ११ कामगारांना प्रत्येकी १० लाखांचा धनादेश
18
ऑलिम्पिक यजमानपदासाठी अहमदाबाद तयार आहे?
19
‘नॅनो बनाना’ची जादू, ‘रेट्रो’ फोटो, त्यामागचे धोके!
20
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले

२०२४ साली ३३३ जागा जिंकण्याचे भाजपचे लक्ष्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 29, 2019 04:19 IST

भाजपने २०२४ साली लोकसभा निवडणुकांमध्ये ३३३ जागा जिंकण्याचे लक्ष्य ठेवले आहे.

नवी दिल्ली : भाजपने २०२४ साली लोकसभा निवडणुकांमध्ये ३३३ जागा जिंकण्याचे लक्ष्य ठेवले आहे. त्यासाठी दक्षिण भारतातील राज्यांवर भाजप अधिक लक्ष केंद्रित करणार आहे, अशी माहिती पक्षाचे सरचिटणीस सुनील देवधर यांनी दिली. भाजपने २०१४च्या लोकसभा निवडणुकांत २८२, तर यंदा ३०३ जागा जिंकल्या आहेत. देवधर पक्षाचे आंध्र प्रदेश, त्रिपुरा या राज्यांचे प्रभारी आहेत. ते म्हणाले, पश्चिम बंगाल ते तामिळनाडू या किनारपट्टीच्या राज्यांवर भाजप अधिक लक्ष केंद्रित करणार आहे. भाजप हा हिंदी भाषिकांचा पक्ष आहे हा गैरसमज दाक्षिणात्य राज्यांतील लोकांच्या मनातून घालविण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. देवधर याआधी बंगाली भाषा शिकले होते. आता ते तेलुगूचे धडे गिरवत आहेत.भाजपच्या एका नेत्याने सांगितले की, २०२४च्या लोकसभा निवडणुकांसाठी भाजपने दक्षिणेतील पाच राज्यांतील संघटना आणखी मजबूत करण्यावर जोर दिला आहे. यंदाच्या भाजपने कर्नाटकात २५ तर, तेलंगणामध्ये चार जागा जिंकल्या. मात्र तामिळनाडू, केरळ, आंध्र प्रदेशमध्ये या पक्षाला खातेच उघडता आले नाही. पश्चिम बंगालमध्ये आता १८ जागा जिंकून जसा चमत्कार घडविला नेमका तोच २0२४ मध्ये दक्षिण भारतात भाजपला साधायचा आहे. बुथपातळीवर पदाधिकाऱ्यांची नेमणुक करून तसेच रा. स्व. संघाच्या साथीने हे करण्यात येईल.>विरोधी मते काँग्रेसकडेशबरीमाला मंदिरात महिलांना प्रवेश द्यावा, या सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालानंतर भाजप व संघपरिवारातील संघटनांनी केरळमध्ये निदर्शने केली. मात्र त्यांच्या हिंदुत्ववादी भूमिकेला निवडणुकांत केरळमधील जनतेने प्रतिसाद दिला नाही. तिथे डाव्या पक्षांच्या विरोधातील मते काँग्रेसकडे वळली. ती आपल्याकडे कशी आणता येतील याचेही प्रयत्न भाजप पुढील पाच वर्षांत करणार आहे.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपा