शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

भाजपचे लक्ष योजनांच्या लाभार्थ्यांवर; अल्पसंख्याक महिलांनाही सरकारी योजनेचे फायदे सांगणार 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 18, 2024 05:50 IST

नवी रणनिती : अल्पसंख्याक महिलांनाही सरकारी योजनेचे फायदे सांगणार

संजय शर्मा, लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : कोणतेही ठोस मुद्दे नसताना या निवडणुकीत भाजप विविध योजनांच्या लाभार्थ्यांना आपलेसे करत आहे. अल्पसंख्याक महिलांनाही तीन तलाक ते मोफत धान्य, आयुष्मान योजना यासह केंद्र सरकारच्या योजनांचे लाभ सांगितले जात आहेत. 

पहिल्या टप्प्यातील मतदान शुक्रवारी होत आहे. अब की बार ३७० पारचा नारा देणाऱ्या भाजपला आता मतांसाठी केंद्र सरकारच्या योजनांच्या लाभार्थ्यांपर्यंत जावे लागत आहे. प्रत्येक मतदान बुथ, वॉर्ड स्तरावरील लाभार्थ्यांची यादी भाजप कार्यकर्त्यांना देण्यात आली आहे. हे कार्यकर्ते लाभार्थ्यांकडे जाऊन त्यांना भाजप सरकारच्या योजना आणि मोदी की गॅरंटी याची माहिती देत आहेत. अल्पसंख्याक भागाकडे विशेष लक्ष देण्यात येत आहे. भाजपचा अल्पसंख्याक मोर्चा आणि महिला मोर्चा बैठका, सभा घेऊन योजनांचे लाभ सांगत आहेत. 

लोकांना काय सांगणार?भाजपचे वरिष्ठ रणनीतिकार राष्ट्रीय सरचिटणीस अरुण सिंह यांनी सांगितले की, ८० कोटी मोफत रेशनचे लाभार्थी आहेत. पंतप्रधान आवास योजनेचे चार कोटी, आयुष्मान योजनेचे २० कोटी, जन धन योजनेचे ५० कोटी, उज्ज्वला योजनेचे ५ कोटी तर, किसान सन्मान योजनेचे १० कोटींहून अधिक लाभार्थी आहेत. त्यांना हे सांगायचे आहे की, जर भाजपचे सरकार आले, तर यापुढेही त्यांना याचा लाभ मिळणार आहे. हे काम भाजपचे कार्यकर्ते आणि नेते देशात करत आहेत.

टॅग्स :BJPभाजपाJ P Naddaजगत प्रकाश नड्डा