केरळमध्ये भाजपचा पहिला विजय

By Admin | Updated: May 19, 2016 14:21 IST2016-05-19T13:38:30+5:302016-05-19T14:21:19+5:30

गेल्या अनेक वर्षांपासून केरळ विधानसभेत प्रवेश करण्यासाठी प्रयत्न करणा-या भाजपला ओ राजागोपाल यांच्या रुपाने पहिले यश मिळाले आहे.

BJP's first victory in Kerala | केरळमध्ये भाजपचा पहिला विजय

केरळमध्ये भाजपचा पहिला विजय

ऑनलाइन लोकमत 

तिरुअनंतपूरम, दि. १९ - केरळमध्ये अखेर खाते उघडण्यात भाजपला यश आले आहे. गेल्या अनेक वर्षांपासून केरळ विधानसभेत प्रवेश करण्यासाठी प्रयत्न करणा-या भाजपला ओ राजागोपाल यांच्या रुपाने पहिले यश मिळाले आहे. ओ राजागोपाल केरळच्या नेमॉम विधानसभा मतदारसंघातून विजयी झाले.  

( इथे पाहा २०१६ विधानसभा निवडणूक निकाल)

हा विजय अशक्यप्राय वाटत होता. त्यांनी सीपीआय (एम)च्या व्ही. सिवानकुटटी यांचा पराभव केला. लोकसभेच्यावेळी केरळमध्ये भाजपची मतांची टक्केवारी वाढली होती. त्यामुळे विधानसभेत काही जागा मिळतील असे वाटत होते. 
 
 
मतमोजणींच्या प्रारंभीच्या फे-यांमध्ये दहा जागांवर भाजप उमेदवारांनी आघाडी घेतली होती. मात्र नंतर फक्त एका जागेपर्यंत ही आघाडी मर्यादीत राहिली. राजागोपाल ८३ वर्षांचे आहेत. 
 

Web Title: BJP's first victory in Kerala

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.