भाजपच्या गडात सेनेची पक्षबांधणी (भाग-२)

By Admin | Updated: January 29, 2015 23:17 IST2015-01-29T23:17:26+5:302015-01-29T23:17:26+5:30

वैदर्भीयांना गृहीत धरू नका

BJP's factionalism (Part-2) | भाजपच्या गडात सेनेची पक्षबांधणी (भाग-२)

भाजपच्या गडात सेनेची पक्षबांधणी (भाग-२)

दर्भीयांना गृहीत धरू नका
शेतकऱ्यांच्या आत्महत्या, शेतमालाला न मिळणारा भाव यामुळे संतापून विदर्भातील शेतकऱ्यांनी आघाडी सरकारच्या विरोधातील राग मतपेटीतून व्यक्त केला. त्यामुळे राज्यात सत्ता परिवर्तन झाले. आता शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे सरकारला गांभीर्याने पाहावे लागेल. मुख्यमंत्री विदर्भाचेच असल्याने ते त्यांना न्याय देतील. विदर्भातील जनतेला गृहीत धरू नये असे संजय राऊत यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या मदत वाटपासंदर्भात ते बोलत होते.
सध्या तरी स्वबळावर
प्रत्येक कार्यकर्त्याला निवडणूक लढविण्याची संधी मिळायला हवी. संघटना वाढीसाठी ही बाब गरजेची आहे. त्यामुळे पुढच्या काळात होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी सध्या तरी शिवसेनेचे धोरण स्वबळाचेच आहे, असे राऊत म्हणाले. यावेळी खासदार कृपाल तुमाने व माजी आमदार आशिष जयस्वाल उपस्थित होते.

Web Title: BJP's factionalism (Part-2)

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.