शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

बीएमसीत भाजपची सरशी, पण चर्चा मात्र 'रसमलाई'ची; पी.सी.मोहनांचा राज ठाकरेंना डिवचणारा फोटो व्हायरल!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 16, 2026 17:52 IST

बीएमसीवर भाजपचे वर्चस्व निर्माण होताना दिसत असतानाच, आता या निवडणुकीत 'रसमलाई'ची एन्ट्री झाली आहे.

मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या निकालांचे चित्र स्पष्ट होताच आता राजकीय वर्तुळात कलगीतुरा रंगू लागला आहे. बीएमसीवर भाजपचे वर्चस्व निर्माण होताना दिसत असतानाच, आता या निवडणुकीत 'रसमलाई'ची एन्ट्री झाली आहे. भाजपचे बंगळुरू सेंट्रलचे खासदार पी.सी. मोहन यांनी सोशल मीडियावर रसमलाईचा फोटो शेअर करत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. "काही रसमलाई मागवली आहे," असे म्हणत त्यांनी राज ठाकरेंना त्यांच्याच भाषेत प्रत्युत्तर दिले आहे.

नेमकं प्रकरण काय? 

बीएमसी निवडणुकीच्या प्रचारादरम्यान भाजपचे नेते आणि खासदार के. अन्नामलाई यांनी मुंबईबाबत एक विधान केले होते. "मुंबई हे शहर केवळ महाराष्ट्राचे राहिलेले नसून ते आता एक आंतरराष्ट्रीय शहर बनले आहे," असे अन्नामलाई म्हणाले होते. त्यांच्या या विधानानंतर मुंबईच्या राजकारणात मोठा गदारोळ माजला होता. राज ठाकरे यांनी अन्नामलाई यांच्यावर सडकून टीका केली होती.

राज ठाकरेंनी 'रसमलाई' असा केला होता उल्लेख 

शिवसेना (ठाकरे गट) आणि मनसेच्या एका संयुक्त रॅलीमध्ये बोलताना राज ठाकरे यांनी अन्नामलाई यांचा समाचार घेतला होता. अन्नामलाई यांच्या नावाचा उच्चार 'रसमलाई' असा करत राज ठाकरेंनी त्यांची खिल्ली उडवली होती. तसेच, "मुंबईवर भाष्य करण्याचा अधिकार त्यांना कोणी दिला?" असा सवालही विचारला होता. इतकेच नाही तर, राज ठाकरेंनी 'हटाओ लुंगी, बजाओ पुंगी' अशी जुनी घोषणा देत दक्षिण भारतीयांवरही निशाणा साधला होता.

अन्नामलाई यांचे खणखणीत प्रत्युत्तर 

राज ठाकरेंच्या या टीकेला अन्नामलाई यांनीही तितक्याच आक्रमकपणे उत्तर दिले होते. "काही लोक मला मुंबईत आल्यावर पाय कापण्याची धमकी देत आहेत. मी मुंबईत येणारच, कोणाला पाय कापायचे आहेत त्यांनी कापून दाखवावेत," असे आव्हान त्यांनी दिले होते. तसेच, मुंबईच्या विकासात मराठी माणसाचे योगदान अमूल्य असल्याचे मान्य करत, माझ्या विधानाचा चुकीचा अर्थ काढला गेल्याचेही त्यांनी स्पष्ट केले होते.

भाजप खासदाराचा पलटवार 

आता बीएमसी निवडणुकीत भाजप विजयाकडे वाटचाल करत असताना खासदार पी.सी. मोहन यांनी राज ठाकरेंनी वापरलेल्या 'रसमलाई' या शब्दाचाच वापर करून त्यांना टोला लगावला आहे. "काही रसमलाई ऑर्डर केली आहे," असे कॅप्शन देत त्यांनी मिठाईचे फोटो शेअर केले. ज्या शब्दाचा वापर करून राज ठाकरेंनी भाजप नेत्याची खिल्ली उडवली होती, आज त्याच शब्दाचा वापर करून भाजपने राज ठाकरेंना डिवचले आहे. यामुळे सोशल मीडियावर आता एकच चर्चा रंगली असून, निवडणुकीच्या निकालानंतर आता हा 'मिठाई वॉर' कुठपर्यंत जातो, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.

English
हिंदी सारांश
Web Title : BJP's BMC win sparks 'Rasmalai' taunt at Raj Thackeray.

Web Summary : BJP's win in BMC elections leads to political banter. PC Mohan mocks Raj Thackeray with 'Rasmalai' reference, recalling Thackeray's earlier criticism of a BJP leader. This sparks a social media debate.
टॅग्स :Municipal Electionमहाराष्ट्र महानगरपालिका निवडणूक २०२६Raj Thackerayराज ठाकरेBJPभाजपाBMC Electionsमुंबई महापालिका निवडणूक निकाल २०२६