शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

भाजपाचे ख्रिश्चन समुदायाला जेरुसलेमच्या मोफत दौऱ्याचे आश्वासन

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 14, 2018 13:46 IST

जेरुसलेमची मोफत दौऱ्याची भेट केवळ नागालँडमधील ख्रिश्चन लोकांसाठी आहे की सर्व भारतीय ख्रिश्चनांसाठी आहे याबाबत कोणतीही माहिती स्पष्ट झालेली नाही.

ठळक मुद्देइस्रायलमधील प्रमुख वृत्तपत्र "जेरुसलेम पोस्ट"च्या संकेतस्थळानेही भाजपाच्या या प्रचाराची दखल घेतली आहे.

नवी दिल्ली- मुस्लीम समुदायाला हज भेटीसाठी देण्यात येणारी सबसिडीरुपी मदत बंद करण्याचा निर्णय घेऊन एक महिना होण्याच्या आतच भाजपाने एक नवा निर्णय घेतला आहे. नागालँडमध्ये सत्तेमध्ये आल्यास ख्रिश्चनधर्मियांना जेरुसलेमची मोफत भेट घडवू असे आश्वासन भाजपाने दिल्याचे ईशान्य भारतातील वृत्तसंस्थांनी प्रसिद्ध केले आहे. मात्र ही जेरुसलेमची मोफत दौऱ्याची भेट केवळ नागालँडमधील ख्रिश्चन लोकांसाठी आहे की सर्व भारतीय ख्रिश्चनांसाठी आहे याबाबत कोणतीही माहिती स्पष्ट झालेली नाही. सध्या मेघालय, नागालँड आणि त्रिपुरा या राज्यांच्या निवडणुकांचा प्रचार सुरु आहे. मेघालयमध्ये 75 टक्के जनता ख्रिश्चन धर्मिय आहे. नागालँडच्या एकूण लोकसंख्येपैकी 88 टक्के लोक ख्रिश्चन आहेत. ख्रिश्चन लोकांना जेरुसलेमची मोफत भेट घडवण्याचे आश्वासन दिल्याचे "वुइदनागाज" या वृत्तसंस्थेने ट्वीट केले आहे तर यूएनआय वृत्तसंस्थेने ही घोषणा नागालँडच्या ख्रिश्चन धर्मियांसाठी केल्याचे वृत्त दिले आहे.  भाजपाच्या या आश्वासनावर आता चोहोबाजूंनी टीका होत आहे. भाजपा केवळ संधीसाधू आणि ढोंगी राजकारण करत असल्याची टीका समाजमाध्यमांमध्ये केली जात आहे. एआयएमआयएमचे नेते असादुद्दिन ओवेसी यांनीही भाजपाच्या या निर्णयावर टीका केली आहे.

हजयात्रेची सबसिडी रद्द करताना केंद्रीय अल्पसंख्यांक मंत्री मुख्तार अब्बास नक्वी म्हणाले होते, ''अल्पसंख्यांकांचे सक्षमीकरण त्यांच्या लांगुलचालनापेक्षा त्यांना सन्मान देऊन करण्यावर भाजपाचा भर आहे. हज सबसिडीला लागणाऱ्या रकमेचा उपयोग मुलींच्या शिक्षणासाठी केला जाईल.'' त्यामुळे आता ख्रिश्चन समुदायाला दिलेल्या या आश्वासनामुळे ते आपल्या विधानावर कायम राहणार का असा प्रश्न निर्माण झाला आहे. इस्रायलमधील प्रमुख वृत्तपत्र "जेरुसलेम पोस्ट"च्या संकेतस्थळानेही भाजपाच्या या प्रचाराची दखल घेतली आहे. भारतातून इस्रायलमध्ये मोठ्या संख्येने पर्यटक जातात. 2017 मध्ये भारतातून 58,000 लोकांनी इस्रायलला भेट दिली होती. 2015 च्या तुलनेमध्ये त्यांच्या संख्येत 58 टक्के इतकी मोठी वाढ झाल्याचे दिसून येेत. 

टॅग्स :BJPभाजपाIsraelइस्रायल