असहिष्णुतेचा सर्वाधिक बळी भाजप - राजनाथ सिंह
By Admin | Updated: December 1, 2015 20:46 IST2015-12-01T20:44:11+5:302015-12-01T20:46:02+5:30
असहिष्णुतेचा सर्वाधिक बळी भाजप ठरली आहे, सहिष्णुता ही आमच्या रक्तातच आहे. या देशात सर्वात जास्त असहिष्णुतेचे शिकार पंतप्रधान नरेंद्र मोदी ठरले आहेत. असे मत ग्रहमंत्री राजनाथ सिंह यांनी व्यक्त केले

असहिष्णुतेचा सर्वाधिक बळी भाजप - राजनाथ सिंह
>ऑनलाईन लोकमत
नवी दिल्ली, दि. १ - असहिष्णुतेचा सर्वाधिक बळी भाजप ठरली आहे, सहिष्णुता ही आमच्या रक्तातच आहे. या देशात सर्वात जास्त असहिष्णुतेचे शिकार पंतप्रधान नरेंद्र मोदी ठरले आहेत. असे मत ग्रहमंत्री राजनाथ सिंह यांनी व्यक्त केले, ते लोकसभेत विरोधकांच्या असहिष्णुतेच्या मुद्द्यावर उत्तर देत होते.
लोकसभेत विरोधकांच्या असहिष्णुतेच्या मुद्दयाला उत्तर देताना ते पुढे म्हणाले भारत अत्तापर्यंत तीन वेळा असहिष्णुतेचा शिकार झाला आहे. भारतात अश्या ३ घटना होऊन गेल्या आहेत, त्यावेळी भारत सर्वात जा्त असहिष्णुतेचा शिकार झाला. पहिला ज्या वेळी भारत-पाक विभाजन झाले त्यावेळी भले ही धार्मीकतेच्या आधारावर लोक विभागले गेले असतील पण आम्ही भारतास एकसंद्ध पाहत होतो. लोकांचा आवाज दाबण्यासाठी आणीबाणी लादण्यात आली त्यावेळी दुसऱ्यांदा तर तिसऱ्यांदा १९८४ला झालेला शिख विरोधी दंगल, आणि यावेळी कोणाचं सरकार होत हे आपणास माहीतच असेल. असा घाणाघाती टोला असहिष्णुतेच्या मुद्दयावर ग्रहमंत्री राजनाथ सिंह यांनी काँग्रेसला दिला.