हरीश गुप्ता -
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासारखे व्हिजन असणारा व्यक्ती बिहारचा पुढील मुख्यमंत्री होईल, असे वक्तव्य एनडीएचा सहयोगी पक्ष लोजपाचे नेते आणि केंद्रीय मंत्री चिराग पासवान यांनी केले आहे. त्यामुळे राज्याच्या राजकीय पटलावरील दृश्य अधिक अनिश्चित झाले आहे.
भाजपचे ज्येष्ठ नेते रविशंकर प्रसाद यांनी दोन दिवसांपूर्वी असे म्हटले की, मुख्यमंत्री पक्षाचा असावा असे भाजपला वाटते यात काहीही चूक नाही. परंतु निवडणुका नितीशकुमार यांच्या नेतृत्वाखाली लढवल्या जातील, असेही त्यांनी स्पष्ट केले.
२०२० च्या विधानसभेत नेमके काय घडले?२०२० च्या विधानसभा निवडणुकीत भाजपने २४३ च्या सभागृहात ७४ जागा जिंकल्या होत्या. तर जनता दल (यु) ने ११५ जागा लढवूनही फक्त ४३ जागा जिंकल्या होत्या. भाजपने फक्त ११० जागा लढवल्या होत्या.
मुख्यमंत्री निवडण्याची वेळ केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी काही आठवड्यांपूर्वी सांगितले होते की, नोव्हेंबरच्या निवडणुकीत बिहारमध्ये एनडीएच्या प्रचाराचे नेतृत्व मुख्यमंत्री नितीशकुमार करतील.
पुढील मुख्यमंत्र्यांच्या प्रश्नावर त्यांनी सांगितले की, पक्षाचे संसदीय मंडळ निवडणुकीनंतर यावर निर्णय घेईल. निवडणुकीनंतर पक्षाने स्वतःचा मुख्यमंत्री निवडण्याची वेळ आली आहे, असे पक्षातील काही नेत्यांना वाटते.
भाजप आता स्वतःच्या बळावर सरकार स्थापन करण्यास सक्षम आहे. तसेच २०२५ मध्ये त्यांना अधिक जागा लढवायच्या आहेत. २०२० च्या निवडणुकीत चिराग पासवान यांनी ११० उमेदवार दिले होते. याचा फटका नितीशकुमार यांना बसल्याचे सांगितले जाते.