मध्य प्रदेशातील अंतर्गत चाचण्यांमुळे भाजपा चिंतित

By ऑनलाइन लोकमत | Published: October 23, 2018 04:53 AM2018-10-23T04:53:24+5:302018-10-23T04:53:35+5:30

राजस्थान, मध्यप्रदेश आणि छत्तीसगढपैकी दोन राज्ये पुन्हा आपल्याचकडे राखण्याचा व राजस्थानात जोरदार लढत देऊ, असा पूर्ण आत्मविश्वास भाजपच्या नेतृत्वाला आहे;

BJP worried due to internal tests in Madhya Pradesh | मध्य प्रदेशातील अंतर्गत चाचण्यांमुळे भाजपा चिंतित

मध्य प्रदेशातील अंतर्गत चाचण्यांमुळे भाजपा चिंतित

हरीश गुप्ता 

नवी दिल्ली : राजस्थान, मध्यप्रदेश आणि छत्तीसगढपैकी दोन राज्ये पुन्हा आपल्याचकडे राखण्याचा व राजस्थानात जोरदार लढत देऊ, असा पूर्ण आत्मविश्वास भाजपच्या नेतृत्वाला आहे; परंतु राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने जी अंतर्गत पाहणी केली ती नेतृत्वाची चिंता वाढवणारी आहे.
अतिउच्च पातळीवरील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पाहणीत उच्च जातींमध्ये वाढणारी अस्वस्थता आणि शेतीच्या संकटामुळे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांची पकड ढिली होत आहे. अनुसूचित जाती/अनुसूचित जमातीच्या कर्मचाऱ्यांना राज्यात बढत्यांमध्ये राखीव जागा देण्याचा आणि अनुसूचित जाती/अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यातील (अ‍ॅट्रॉसिटी अ‍ॅक्ट) अत्यंत कठोर तरतुदी कायम ठेवण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयाने उच्च जातींमध्ये मोठा संताप निर्माण झाला आहे. भाजपच्या पारंपरिक मतदारांमध्ये यामुळे मोठा गंभीर असंतोष निर्माण केला असून, नव्या मतपेटीवर भर द्यायची वेळ आली आहे.
फार मोठ्या प्रमाणावर कृषी उत्पादन झाल्यास त्यातून काही अडचणी निर्माण होतात. शेतकºयांना त्यांचे कृषी उत्पादन किफायतशीर दराने विकले जात नसल्यामुळे शेतकºयांत असंतोष वाढत चालला आहे.
>...तर नौका पैलतीरी नेता येईल
एक मतप्रवाह असा आहे की, काही भागांतील सत्ताधाºयांविरुद्धचा राग यशस्वीपणे हाताळला गेला, तर विद्यमान आमदारांपैकी ४० टक्क्यांना तिकिटे नाकारली जावीत. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्या नेतृत्वाखालील भाजपच्या केंद्रीय शाखेने तीन वेगवेगळ्या संस्थांकडून पाहणी करून घेतली आहे.स्वत: भाजपने केलेल्या पाहणीतदेखील शिवराजसिंह चौहान सरकार यातून नौका पैलतीरी नेईल; परंतु त्यांना गंभीर प्रश्नांना सामोरे जावे लागेल, असे आढळले आहे.

Web Title: BJP worried due to internal tests in Madhya Pradesh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.