शहरं
Join us  
Trending Stories
1
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
2
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
3
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
4
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
5
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
6
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
7
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
8
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
9
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
10
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
11
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
12
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
13
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
14
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
15
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
16
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
17
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
18
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
19
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
20
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
Daily Top 2Weekly Top 5

अगला सीएम कैसा हो...गिरिराज सिंह जैसा हो...; बेगूसरायमध्ये भाजपा कार्यकर्त्यांची घोषणाबाजी

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 9, 2019 16:39 IST

बिहारमध्ये पुढील वर्षी विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत.  

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारमधील कॅबिनेट मंत्री आणि आपल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे सतत चर्चेत राहणारे गिरीराज सिंह यांना बिहारचे मुख्यमंत्री करण्याची मागणी करण्यात येत आहे. भाजपाचे कार्यकर्ते आणि गिरीराज सिंह यांच्या समर्थकांकडून ही मागणी केली जाते आहे. बिहारमधीलबेगूसराय लोकसभा मतदारसंघातून विजय मिळवल्यानंतर गिरीराज सिंह यांनी रविवारी आपल्या समर्थकांची भेट घेतली. यावेळी समर्थकांनी गिरीराज सिंह यांच्यासारखा बिहारमधील पुढील मुख्यमंत्री व्हावा, अशी घोषणाबाजी केली.  

भाजपाच्या एका नेत्याने सांगितले की, बिहारचे पुढील मुख्यमंत्री गिरीराज सिंह व्हावेत, अशी पार्टीच्या कार्यकर्त्यांची आणि त्यांच्या समर्थकांची इच्छा आहे. कार्यकर्ते आणि त्यांच्या समर्थकांच्या या मागणीमुळे सध्याचे मुख्यमंत्री आणि जेडीयूचे अध्यक्ष नितीश कुमार यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. कारण, बिहारमध्ये पुढील वर्षी विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत.  

गेल्या काही दिवसांपूर्वी गिरीराज सिंह यांनी मुख्यमंत्री नितीश कुमार, लोक जनशक्ती पार्टीचे प्रमुख व केंद्रीय मंत्री रामविलास पासवान यांच्यावर इफ्तार पार्टीचे आयोजन केल्यामुळे ट्विटरवरुन त्यांच्यावर निशाना साधला होता. यामध्ये नितीश कुमार यांनी राज्यभरात आयोजित करण्यात आलेल्या इफ्तार पार्टींमध्ये लावलेल्या उपस्थिती म्हणजे केवळ दिखावा असल्याचे म्हटले होते. याबाबत गिरीराज सिंह यांनी आपल्या अधिकृत ट्विटर खात्यावरून नितीश कुमारांचे इफ्तार पार्टीतील काही फोटोज देखील शेअर केले होते. 

दरम्यान, नितीश कुमार यांच्यावर टीका केल्यानंतर भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहांनी गिरीराज सिंह यांना चांगलेच सुनावले. अमित शहा यांनी गिरीराज सिंह यांना फोन करून, यापुढे अशा प्रकारचे कोणतेही वक्तव्य करण्यास सक्त मनाई केली आहे. 

टॅग्स :begusarai-pcबेगूसरायBiharबिहारBJPभाजपा