भाजप कार्यकर्त्यांचे वाराणसीत धरणे आंदोलन
By Admin | Updated: May 8, 2014 15:20 IST2014-05-08T12:24:48+5:302014-05-08T15:20:34+5:30
भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांना वाराणसीत सभेला परवानगी नाकारल्याच्या निषेधार्थ हजारो भाजप कार्यकर्ते वाराणसी तसेच दिल्लीत रस्त्यावरील आंदोलनात उतरले होते.

भाजप कार्यकर्त्यांचे वाराणसीत धरणे आंदोलन
ऑनलाइन टीम
वाराणसी, दि. ८ - भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांना वाराणसीत सभेला परवानगी नाकारल्याच्या निषेधार्थ हजारो भाजप कार्यकर्ते वाराणसी तसेच दिल्लीत रस्त्यावरील आंदोलनात उतरले होते. सुमारे तीन तासांनंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले.
गुरूवारी वाराणसीत मोदींची सभा होणार होती, मात्र या सभेसाठी ज्या मैदानाची परवानगी मागण्यात आली होती, मैदान रिकामे नसल्याचे सांगत जिल्हा प्रशासनाने सभेला परवानगी नाकारली. त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये नाराजीचे वातावरण आहे. या निषेधार्थ सर्वत्र आंदोलन सुरू असून मोदींच्या दिल्लीत बनारस हिंदू विद्यापाठीबाहेर भाजप कार्यकर्ते पोचले मोठमोठ्याने घोषणा देत निदर्शने सुरू होती. अरुण जेटली, अमित शहा, मुख्तार अब्बास नक्वी आदी ज्येष्ठ नेतेही या धरणे आंदोलनात सहाभागी झाले असून ते निवडणूक आयोगाच्या कार्यालयाबाहेर उपस्थित आहेत. तर वाराणसीमध्येही कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात जमा झाल्याने शहरातील सर्वसामान्यांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत होता.