शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

बंगळुरूमध्ये भाजपा कार्यकर्त्याची चाकूनं सपासप वार करुन हत्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 1, 2018 17:57 IST

कर्नाटक विधानसभा निवडणुकीपूर्वी बंगळुरूमध्ये एका भाजपा कार्यकर्त्याची चाकूनं सपासपा वार करुन हत्या करण्यात आली आहे

बंगळुरू - कर्नाटक विधानसभा निवडणुकीपूर्वी बंगळुरूमध्ये एका भाजपा कार्यकर्त्याची चाकूनं सपासपा वार करुन हत्या करण्यात आली आहे. हत्या करण्यात आलेल्या भाजपा कार्यकर्त्याचं नाव संतोष असल्याची माहिती समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना बुधवारी (31 जानेवारी) घडली आहे. संतोष जे.सी.नगरमधील चिनप्पा पार्कात भाजपाच्या परिवर्तन रॅलीच्या पार्श्वभूमीवर झेंडे लावण्याचं काम करत होता.  यादरम्यान, चार जणांसोबत त्याची वादावादी झाली. यावेळी संतोषवर चाकूनं सपासपा वार करण्यात आले. यावेळी सर्व हल्लेखोर दारूच्या नशेत होते.

भाजपा कार्यकर्त्याची हत्या झाल्याच्या वृत्ताला पोलिसांनी दुजारो दिला आहे. मात्र ही घटना राजकीय वादातून घडल्याचं पोलिसांनी नाकारलं आहे. मात्र दुसरीकडे, भाजपानं संतोषची हत्या राजकीय वादातून झाल्याचा दावा केला आहे. याप्रकरणी वसीम व फिलिप या दोन जणांना अटक करण्यात आली आहे. भाजपा युवा मोर्चाचा सदस्य असलेला संतोष हा वसंत नगर परिसरातील रहिवासी होता. दरम्यान, राज्यात विधानसभा निवडणुकीची जोरदार  तयारी सुरू असतानाच ही घटना घडली. 

कर्नाटकात भाजपाकडून परिवर्तन यात्रेचं आयोजन करण्यात आले आहे. 4 फेब्रुवारीला बंगळुरूमध्ये पार्टीची रॅली काढण्यात येणार आहे. जे.सी. नगर ठाण्यातील पोलीस अधिका-यांनी दिलेल्या माहितीनुसार, आणखी दोन आरोपी फरार आहेत. अटक करण्यात आलेल्या आरोपींनी चौकशीदरम्यान असे सांगितले की, संतोषनं या चारही जणांना दारू विकत आणण्यास सांगितली, यावरुन संतोष व चार जणांमध्ये खटके उडाले व बाचाबाची झाली. वादावादीदरम्यानच संतोषवर सपासप चाकूनं वार करण्यात आले. दरम्यान पोलिसांनी भाजपाकडून करण्यात आलेला दावा फेटाळून लावले आहेत. पोलीस अधिका-यांनी सांगितले की, संतोष व चारही आरोपी शेजारी-शेजारी होते. दरम्यान, कर्नाटकात गेल्या काही दिवसांपासून हत्यासत्रांमध्ये वाढ झाली आहे.  

टॅग्स :BJPभाजपाMurderखूनKarnatakकर्नाटक