केरळमध्ये भाजप कार्यकर्त्याची हत्या
By Admin | Updated: October 12, 2016 15:33 IST2016-10-12T14:47:16+5:302016-10-12T15:33:04+5:30
केरळमध्ये सीपीएमच्या कार्यकर्त्याच्या खूनाला 48 तास उलटले नसतानाच पुन्हा एका भारतीय जनता पक्षच्या कार्यकर्त्याची हत्या करण्यात आली आहे.

केरळमध्ये भाजप कार्यकर्त्याची हत्या
ऑनलाइन लोकमत
कन्नूर, दि. 12 - केरळमध्ये सीपीएमच्या कार्यकर्त्याच्या खूनाला 48 तास उलटले नसतानाच पुन्हा एका भारतीय जनता पक्षच्या कार्यकर्त्याची हत्या करण्यात आली आहे. मुख्यमंत्री पिनाराई विजयन यांच्याच परिसरात ही हत्या करण्यात आली आहे. यामुळे याठिकाणी काहीप्रमाणात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.
रेमिथ असे या भाजपच्या कार्यकर्त्याचे नाव असून कन्नूर जिल्ह्यातील एका पेट्रोल पंपाजवळ बुधवारी सकाळी 10 वाजताच्या सुमारास अज्ञातांकडून त्याच्यावर हल्ला करण्यात आला. त्यानंतर रेमिथला रुग्णालयात घेऊन जाताना त्याचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले.
रेमिथची हत्या ही केरळचे मुख्यमंत्री पिनाराई विजयन यांच्या घरापासून काही अंतरावर झाली. यामुळे या परिसरात काहीप्रमाणात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.
राज्यात एलडीएफचे सरकार आल्यापासून कन्नूर जिल्ह्यात आत्तापर्यंत पाच जणांचे खून झाल्याचे उघड झाले आहे. दरम्यान, रेमिथच्या हत्येच्या निषेधार्थ भाजपने उद्या केरळ बंदची हाक दिली आहे.