हार्दिक पटेलच्या गावात भाजप विजयी

By Admin | Updated: December 2, 2015 13:47 IST2015-12-02T13:45:26+5:302015-12-02T13:47:49+5:30

गुजरातमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत पाटीदार पटेल आंदोलनाचा नेता हार्दिक पटेलच्या गावाता भाजपाचा विजय झाला आहे.

BJP won in Hardik Patel's village | हार्दिक पटेलच्या गावात भाजप विजयी

हार्दिक पटेलच्या गावात भाजप विजयी

ऑनलाईन लोकमत 

अहमदाबाद, दि. २ - गुजरातमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची मतमोजणी सुरु असून आपल्या आंदोलनाने संपूर्ण गुजरात हलवणारा पाटीदार पटेल आंदोलनाचा नेता हार्दिक पटेलच्या विरामगाम गावात चक्क भाजपने बाजी मारली आहे. 
पाटीदार पटेल समाजासाठी आरक्षणांची मागणी करुन संपूर्ण गुजरातमध्ये पटेल समाजाचे मोठे आंदोलन उभारणा-या हार्दिक पटेलचे भाजपसमोर आव्हान होते. मात्र भाजपने स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ब-यापैकी यश मिळवले असून, हार्दिकच्या आंदोलनचा मोठा फटका भाजपला बसलेला नाही.   
हार्दिकच्या स्वत:च्या गावामध्ये मतदारांनी हार्दिकला साथ न देता भाजपला साथ दिली आहे. भाजपने शहरी भागांमध्ये चांगली कामगिरी केली आहे तर, काँग्रेसने ग्रामीण भागांमध्ये चांगली कामगिरी केली आहे. 

Web Title: BJP won in Hardik Patel's village