विधानसभा पोटनिवडणुकीत छत्तीसगडमध्ये भाजपा विजयी
By Admin | Updated: September 21, 2014 01:11 IST2014-09-21T01:11:31+5:302014-09-21T01:11:31+5:30
छत्तीसगडच्या अंतागड विधानसभा जागेसाठी झालेल्या पोटनिवडणुकीत सत्ताधारी भाजपाने बाजी मारली आह़े शनिवारी झालेल्या मतमोजणीत भाजपाने अंतागड जागा स्वत:कडे कायम राखली.

विधानसभा पोटनिवडणुकीत छत्तीसगडमध्ये भाजपा विजयी
रायपूर : छत्तीसगडच्या अंतागड विधानसभा जागेसाठी झालेल्या पोटनिवडणुकीत सत्ताधारी भाजपाने बाजी मारली आह़े शनिवारी झालेल्या मतमोजणीत भाजपाने अंतागड जागा स्वत:कडे कायम राखली.
भाजपाचे भोजराज नाग यांनी आंबेडकराईट पार्टी ऑफ इंडियाचे रूपधर पुडो यांचा 51 हजार 53क् मतांनी पराभव केला़ विक्रम उसंडी हे लोकसभेवर निवडून गेल्याने ही जागा रिक्त झाली़ या जागेसाठी 13 सप्टेंबरला पोटनिवडणूक झाली़
‘नोटा’ ला दुस:या क्रमांकाची मते
अंतागड पोटनिवडणुकीत सुमारे 13,5क्6 मतदारांनी ‘वरीलपैकी कुणीही नाही’ (ल्लल्ली ा 3ँी ुं5ी) अर्थात ‘नोटा’च्या अधिकाराचा वापर केला़ भोजराज नाग यांना 63,616 मते पडली़ ‘नोटा’वर 13,5क्6 मतदारांनी विश्वास टाकला, तर आंबेडकराईट पार्टी ऑफ इंडियाचे रूपधर पुडो यांना तिस:या क्रमांकाची 12,क्86 मते पडली़ या अर्थाने ‘नाटो’ या पोटनिवडणुकीत दुस:या क्रमांकावर राहिला़ (वृत्तसंस्था)