शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
5
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
6
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
7
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
8
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
9
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
10
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
11
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
12
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
13
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
14
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
15
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
16
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
17
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
18
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
19
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
20
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
Daily Top 2Weekly Top 5

हरियाणातील ‘जिंद’ जिंकल्याने भाजपा जोरात

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 12, 2019 06:34 IST

अंतर्गत वाद सोडविण्यात काँग्रेस मग्न; सुरजेवालांमुळे ज्येष्ठ कार्यकर्ते नाराज

- सुहास शेलारऐन लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय प्रतिष्ठेचा विषय बनलेल्या जिंद विधानसभा पोटनिवडणुकीत मिळालेल्या विजयामुळे भाजपा कार्यकर्त्यांत पुन्हा उत्साह निर्माण झाला. हाच उत्साह लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीपर्यंत टिकवून ठेवण्यासाठी मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर प्रयत्नशील आहेत. तर दुसरीकडे प्रतिस्पर्धी काँग्रेस मात्र अंतर्गत वादविवाद सोडविण्यात मग्न आहे.तीन राज्यांतील पराभवानंतर भाजपाच्या हरियाणा गडालाही सुरूंग लावण्याचा मनसुबा राहुल गांधी यांनी आखला. त्यासाठीची पूर्वतयारी म्हणून जिंद पोटनिवडणुकीची निवड केली. राष्ट्रीय प्रवक्ते रणजीत सुरजेवाला यांना तेथून आखाड्यात उतरवले. ते मोठ्या मताधिक्याने विजयी होतील, अशी अपेक्षा होती. मात्र, अपेक्षाभंगच झाला. सुरजेवाला यांना तिसऱ्या क्रमांकाची मते मिळाली. जाटांचा प्रभाव असलेल्या या मतदारसंघात पहिल्यांदाच कमळ खुलले. त्यामुळे भाजपाच्या गडाच्या शिळा निखळण्याऐवजी घट्ट झाल्या.ज्येष्ठ नेत्यांना डावलून सुरजेवाला यांना उमेदवारी दिल्याने स्थानिक काँग्रेस नेते आणि कार्यकर्त्यांनी बंड केले. ‘हरियाणातील काही नेत्यांनी अप्रत्यक्षरित्या माझ्या विरोधात प्रचार करण्याची सूचना कार्यकर्त्यांना दिली’, असा आरोप थेट आरोप पत्रकार परिषदेतून करत सुरजेवाला यांनी स्थानिक नेत्यांना आपल्या पराभवास जबाबदार धरले. शिवाय पक्षश्रेष्ठी या पराभवाची मीमांसा करून अंतर्गत बंडखोरांना जागा दाखवतील, अशी तंबीही त्यांनी या वेळी दिली. त्यामुळे सुरजेवाला राहुल गांधींचे कान भरतात, अशी भावना मनात ठेवून तेथील ज्येष्ठ नेते सध्या वावरत आहेत. त्यामुळे जेथे भाजपाच्या प्रचाराला उभारी मिळाली आहे, तेथे काँग्रेस कार्यकर्त्यांत मात्र निरुत्साह आहे.तुल्यबळ प्रतिस्पर्धी नाहीच.हरियाणात काँग्रेसच्या प्रचाराला जरी गती मिळत नसली, तरी इंडियन नॅशनल लोकदल (इनेलो)ने मात्र जोरदार प्रचाराला सुरूवात केली आहे. हांसी येथील इनेलोच्या रॅलीला मिळालेला प्रतिसाद पाहता भाजपाला त्यांच्याकडून कडवी टक्कर मिळण्याची शक्यता आहे.मात्र, ऐन निवडणुकीच्या तोंडावर चार आमदार आणि अनेक वरिष्ठ नेत्यांनी इनेलोला रामराम ठोकत जननायक जनता पार्टीत प्रवेश केल्याने त्यांना मोठा हादरा बसला आहे. दुसरीकडे जननायक जनता पार्टी या नवोदीत पक्षाने जिंदच्या पोटनिवडणुकीत दुसऱ्या क्रमांकाची मते मिळवून सगळ््यांनाच आश्चर्यचकीत केले होते. त्यावेळेस ‘आप’ने त्यांना पाठिंबा दिला होता. मात्र, आता आप स्वबळावर लढण्याची तयारी करीत आहे. त्यामुळे भाजपाचा रथ रोखण्यासाठी त्यांनी मोठी घोडदौड करावी लागणार आहे. ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर मात्र, सर्वसामान्य मतदारांना खूष करण्यासाठी अनेक घोषणा करण्यात आल्या. त्यांना मतदार भुलतील का? हे निकालानंतरच कळेल.भाजपा देणार आयारामांना संधी?मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर यांचे माध्यम सल्लागार राजीव जैन यांनी एका कार्यक्रमादरम्यान पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना म्हटले होते की, ‘हरियाणात भाजपाला स्पष्ट बहुमत मिळण्याची शक्यता सर्वेक्षणांनी वर्तविली आहे. जिंद पोटनिवडणुकीच्या विजयानंतर विरोधी पक्षातील अनेक नेत्यांना भाजपाच्या विजयाचा अंदाज आल्याने ते भाजपात येऊ इच्छित आहेत. त्यामुळे निवडणूक जाहीर झाल्यानंतर विरोधी पक्षातील अनेक ज्येष्ठ नेते भाजपात दिसल्यास नवल वाटायला नको.’

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९BJPभाजपाHaryanaहरयाणाcongressकाँग्रेस