शहरं
Join us  
Trending Stories
1
"ज्यांच्याकडे काहीच नाही, त्यांच्याकडे संविधानाची गॅरंटी आहे"; नामिबियात PM मोदींच्या भाषणाला स्टँडिंग ओव्हेशन
2
IND W vs ENG W : इंग्लंडच्या मैदानात टीम इंडियानं रचला इतिहास; इथं पहिल्यांदाच जिंकली T20I मालिका
3
संजय गायकवाडांचा कँटिनमध्ये राडा; अन्न आणि औषध प्रशासनाची अजंता केटरर्सवर मोठी कारवाई
4
ट्रम्प यांनी पुन्हा फोडला टॅरिफ बॉम्ब...! इराक, फिलिपिन्ससह 'या' 6 देशांना बसणार फटका
5
'डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर कधीही होऊ शकतो 'ड्रोन हल्ला', खामेनेई यांच्या जवळच्या माणसाची अमेरिकेला खुली धमकी!
6
कुणाचा तरी राग माझ्यावर का काढता? अर्थसंकल्प कशाला मांडता म्हणणाऱ्या जाधवांना अजितदादांचे प्रत्युत्तर
7
"...तर मॉस्को अन् बिजिंग बॉम्बनं उडवेन!" ट्रम्प यांची पुतीन-जिनपिंग यांना खुली धमकी? 'ऑडिओ' लीक!
8
"गौतम गंभीरला काहीही बोलू नका; भारत मालिका हरला तरीही..."; योगराज सिंह यांनी कुणाला ठणकावलं?
9
“...तर राज्याच्या साधनसंपत्तीत भर, आर्थिक शिस्तीचे पालन करीतच अर्थकारभार”: DCM अजित पवार
10
युतीबाबत न बोलण्याचे राज ठाकरेंचे स्पष्ट आदेश, उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
11
"मराठी अस्मिता जपली पाहिजे पण..."; भाषेच्या वादात जान्हवी कपूरची उडी; बॉयफ्रेंड शिखर पहारियाची पोस्ट केली शेअर
12
सावधान! हे अ‍ॅप तुमच्या हॉट्स अ‍ॅपचे मेसेज वाचू शकते, आताच सेटिंग्स बदला
13
अकोल्यात तरुणीवर कारमध्ये अत्याचाराचा प्रयत्न, आराेपीच्या गुप्तांगावर लाथ मारत करून घेतली स्वतःची सुटका
14
ठाकरे बंधू एकत्र आल्यास महाविकास आघाडी फुटणार का? पृथ्वीराज चव्हाणांचे सूचक विधान, म्हणाले...
15
शाळेत शिकणारी मुलगी प्रेगनंट राहिल्यास १ लाख रुपये मिळणार; रशियाच्या या योजनेची होतेय चर्चा
16
मीरारोडचे पोलीस आयुक्त मधुकर पांडेंची बदली; मराठी मोर्चाला परवानगी नाकारल्याने मुख्यमंत्रीही वैतागले
17
पुन्हा रॉकेट बनला MRF चा शेअर, गेला ₹ 150000 पार; लोकांना केलं मालामाल! दिला बंपर परतावा
18
“महाराष्ट्रातील मतचोरीचा पॅटर्न बिहारमध्ये वापरायचा भाजपा, निवडणूक आयोगाचा प्रयत्न”: सपकाळ
19
"आमच्यावर आरोप केला जातो, शिवसेनेने मराठी माणसासाठी काय केलं? माझं सरकार यांनी पाडलं नसतं तर...! काय म्हणाले उद्धव ठाकरे?
20
रामललांसाठी आणखी एक अस्सल सागवानी लाकडाचे खास भव्य मंदिर बनणार; अयोध्येत कुठे बांधले जाणार?

दिल्लीतील लोकसभेच्या सर्व जागा भाजपा जिंकणार - अमित शहा

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 24, 2018 03:37 IST

राजधानी दिल्लीतील सर्व लोकसभा मतदारसंघांमध्ये पुन्हा भाजपाचेच उमेदवार विजयी होतील,असा दावा या पक्षाचे अध्यक्ष अमित शहा यांनी आज येथे केला.

- नितिन अग्रवालनवी दिल्ली   - राजधानी दिल्लीतील सर्व लोकसभा मतदारसंघांमध्ये पुन्हा भाजपाचेच उमेदवार विजयी होतील,असा दावा या पक्षाचे अध्यक्ष अमित शहा यांनी आज येथे केला. देशाच्या विकासामध्ये पूर्वांचलमधील बांधवांचा मोठा वाटा आहे, असे ते म्हणाले. दिल्ली प्रदेश भाजपाने आयोजित केलेल्या मेळाव्यामध्ये त्यांनी पूर्वांचलवर झालेल्या अन्यायाबाबत काँग्रेसला जबाबदार धरले.दिल्लीतील ऐतिहासिक रामलीला मैदानात ‘पूर्वांचल महाकुंभ’मध्ये ते बोलत होते. ते म्हणाले, ‘२०१४ पूर्वी जे जे सरकार आले, त्यामध्ये काँग्रेसचे सरकार ५५ वर्षे होते. पूर्वांचलवासीयांवर सर्वाधिक अन्याय काँग्रेसनेच केला. भाजपा विकासाचे राजकारण करणारा पक्ष आहे. विरोधी पक्षांचे धोरण केवळ नरेंद्र मोदी यांना हटविणे हे आहे. आम्ही मतांचे राजकारण करीत नाही. आमचा पक्ष देशहिताला सर्वोच्च प्राधान्य देतो.’पूर्वांचलच्या विकासाचे आश्वासन स्मरणात आणून देत शहा म्हणाले, ‘मोदी म्हणाले होते की भाजपाचे सरकार आले, तर पूर्वांचलचा विकास होईल. तो हिशेब मांडण्यासाठी मी आलो आहे. बिहार, झारखंड, ओडिशासारख्या राज्यांमध्ये झालेल्या विकासावरुन ती किती पुढे गेली आहेत ते दिसून येते. या सर्व राज्यांसाठी काँग्रेसच्या सरकारने केवळ ४ लाख कोटी रुपये दिले होते. पण आमच्या सरकारने केवळ साडेचार वर्षांमध्ये १३.८० लाख कोटी दिले. त्यातील ११ लाख कोटी खर्च झाले आहेत.’मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर टीकास्त्र सोडताना शहा म्हणाले, ‘खोटे बोलणे हा त्यांचा एकमेव मंत्र आहे. राष्ट्रीय नागरिकता रजिस्टरमध्ये (एनआरसी) झालेल्या घुसखोरीवर अरविंद केजरीवाल आणि काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी त्यांचे मत स्पष्ट करावे.दिल्ली प्रदेश भाजपा अध्यक्ष मनोज तिवारी यांनी केजरीवाल सरकारवर जोरदार टीका केली. दिल्लीच्या समस्या आजही जशाच्या तशा आहेत. ३ मुलींचा भूकबळी गेला, तरी ते तिकडे फिरकले नाहीत, असे ते म्हणाले. तिवारी यांनी ‘एनआरसी’ दिल्लीतही लागू करण्याची मागणी केली. केजरीवाल सरकार रोहिंग्या आणि बांगलादेशी घुसखोरांना पायघड्या अंथरत असल्याचाही आरोप केला. सीलिंग करुन लोकांना हैराण करुन सोडले जात असल्याचा आणि या कारवाईत सर्वोच्च न्यायालयाला बदनाम केले जात असल्याचाही आरोप केला.केंद्रीय मंत्री डॉ. हर्षवर्धन, खासदार, आमदार आणि पूर्वांचलमधील नामवंत नेत्यांचा या मेळाव्यात समावेश होता. लोकसभा निवडणुकांपूर्वी झालेल्या या मेळाव्याला मोठे महत्त्व दिले जात आहे. या माध्यमातून दिल्लीत मोठ्या संख्येने राहणाऱ्या पूर्वांचलच्या मतदारांचे तुष्टीकरण केले जात आहे.

टॅग्स :PoliticsराजकारणAmit Shahअमित शाहBJPभाजपाdelhiदिल्ली