शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकमत इम्पॅक्ट: गणेश मंडळांना मोठा दिलासा, मंडपासाठीच्या खड्ड्यांचा दंड १५ हजारावरुन २ हजारावर  
2
'एक दिवस पाकिस्तान भारताला तेल विकेल'; अमेरिकेचा पाकिस्तानसोबत करार, डोनाल्ड ट्रम्प काय म्हणाले?
3
मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणात सर्व आरोपी निर्दोष सुटल्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया, म्हणाले...
4
बाईकचा चेसिस नंबर सापडलाच नाही! प्रज्ञा सिंह ठाकूर मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातून कशा सुटल्या?
5
सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण, १० ग्रॅमसाठी किती खर्च करावे लागणार; पाहा नवे दर
6
मला माझे ९०० रुपये परत हवेत; मालेगाव बॉम्बस्फोटात निर्दोष सुटलेल्या समीर कुलकर्णींची मागणी 
7
मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरण निकाल: सर्व सात आरोपींची निर्दोष मुक्तता, कुणावर होते काय आरोप?
8
Upcoming Smartphones: विवो, रेडमीपासून ते गूगल पिक्सेलपर्यंत; ऑगस्टमध्ये पडणार स्मार्टफोनचा पाऊस!
9
पाकिस्तानी बॉर्डरजवळ विखुरलेल्या बांगड्यांचं सत्य काय?; भारताने शोधून काढलं दडलेलं रहस्य
10
मालेगाव बॉम्बस्फोटाच्या निर्णयावर ओवेसी नाराज, मोदी सरकारवर केले गंभीर आरोप...
11
शिक्षण महागलं! "ABCD शिकवण्याचे २.५ लाख द्यायचे?"; लेकीची नर्सरीची फी पाहून आई शॉक
12
सावधान! AI मुळे 'या' नोकऱ्या धोक्यात? मायक्रोसॉफ्टच्या अभ्यासात धक्कादायक खुलासा, तुमची नोकरी सुरक्षित आहे का?
13
ट्रम्प यांचा भारतावरील टॅरिफ बॉम्ब अमेरिकन लोकांवरच उलटणार? औषधांच्या किंमती वाढण्याचा धोका
14
"राजकीय बदनामीच्या षड्यंत्राचा पर्दाफाश, काँग्रेसने हिंदूंची माफी मागावी", भाजपाचा हल्लाबोल
15
"हिंदू दहशतवादी नाही, शाहांचं विधान अन् आज कोर्टात आरोपींची निर्दोष सुटका हा फक्त योगायोग"
16
१७ वर्षांनी आरोपी निर्दोष सुटले, मग दोषी कुठे आहेत?; मालेगाव स्फोट खटल्याच्या निकालानंतर प्रश्नचिन्ह
17
धक्कादायक! ८ वर्षांच्या चिमुकल्याच्या गुप्तांगावर शिक्षिकेनं फवारलं कॉलीन; नालासोपाऱ्याच्या शाळेला टाळं
18
लॉर्ड्स मैदानावर खेळला शाहिद कपूर, इंग्लंडच्या माजी खेळाडूंसोबत शेअर केले Photo
19
Malegaon Blast Case Verdict : मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातून निर्दोष सुटताच प्रज्ञा सिंह भावूक, अश्रू अनावर, म्हणाल्या - 'भगवा जिंकला...'
20
मालेगाव बॉम्बस्फोट; कधी अन् कसा झाला? किती लोक मृत्यूमुखी पडले? जाणून घ्या पूर्ण टाईमलाईन

"भाजपा काही वर्षांनी श्री श्री गोडसेला भारतरत्न देण्याचीही शिफारस करेल"

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 17, 2019 20:34 IST

लोकसभा निवडणुकीच्या अंतिम टप्प्यापूर्वीच राजकीय नेत्यांमध्ये जोरदार आरोप-प्रत्यारोप सुरू आहे.

नवी दिल्लीः लोकसभा निवडणुकीच्या अंतिम टप्प्यापूर्वीच राजकीय नेत्यांमध्ये जोरदार आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. गेल्या काही दिवसांपूर्वीच भाजपाच्या साध्वी प्रज्ञा सिंह यांनी नथुराम गोडसेला देशभक्त म्हटलं होतं. या विधानाचा आता एमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवैसी यांनी खरपूस समाचार घेतला आहे. ओवैसींनी ट्विट करत भाजपावर निशाणा साधला आहे.काही वर्षांनी श्री श्री गोडसेला भारतरत्न देण्याचीही शिफारस भाजपा करेल, असं ओवैसी म्हणाले आहेत. ओवैसी म्हणतात, नरेंद्र मोदींनी प्रज्ञा सिंह ठाकूर यांच्या उमेदवारीचा बचाव आणि समर्थन केलं आहे. हे काही साध्वीचं व्यक्तिगत मत नाही. भाजपा पक्ष हा स्वतंत्र भारतातल्या पहिल्या दहशतवाद्याबरोबर आहे. येत्या काही वर्षांत श्री श्री गोडसेचं नाव भारतरत्नासाठी देण्याची भाजपा शिफारस करेल, असं ओवैसी म्हणाले आहेत. त्यांनी ट्विटवर व्हिडीओ पोस्ट करत ममता बॅनर्जी यांचं समर्थन केलं आहे.कोलकात्यात सुरू असलेल्या वादाला भाजपाच जबाबदार असल्याचंही त्यांनी सांगितलं आहे. पश्चिम बंगालमध्येही निष्पक्ष निवडणूक होण्याची मागणी केली जात आहे. फक्त पश्चिम बंगालमध्येच असं का होतंय. पूर्ण सात टप्प्यांमध्ये असं झालं पाहिजे, असंही ओवैसी म्हणाले आहेत.साध्वी प्रज्ञा सिंह यांनी नथुराम गोडसेबाबत केलेल्या वक्तव्यामुळे लोकसभा निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यातील मतदानापूर्वी भाजपाच्या अडचणी वाढल्या आहेत. साध्वी यांनी याप्रकरणी माफी मागितली असली तरी या विधानावरून भाजपावर चौफेर टीका होत आहे. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी साध्वी प्रज्ञा सिंह यांच्या वक्तव्यावर पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली असून, साध्वी यांचे वक्तव्य घृणास्पद आहे. त्यांनी माफी मागितली असली तरी मी त्यांना मनाने कधीच माफ करू शकणार नाही असे मोदींनी म्हटले आहे.  

टॅग्स :Asaduddin Owaisiअसदुद्दीन ओवेसीSadhvi Pragya Singh Thakurसाध्वी प्रज्ञा