शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
2
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
3
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
4
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
5
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
6
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
7
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
8
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
9
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
10
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
11
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
12
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
13
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
14
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
15
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
16
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
17
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
18
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
19
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
20
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द

लोकसभेच्या मैदानात भाजपा खेळणार टी-२०, कॉँग्रेसचीही देशातील प्रत्येक बूथवर फिल्डिंग!

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 17, 2018 06:46 IST

निवडणुकीसाठी तयारी सुरू; दोन्ही प्रमुख पक्षांनी आखली ‘बूथ’ रणनीती!

नवी दिल्ली : लोकसभेच्या रणांगणासाठी सर्वच पक्षांची जोरदार तयारी असून, रणनिती आखण्यास सुरुवात केली आहे. येत्या निवडणुकीत भाजपा ‘टी-२०’ फॉर्म्युला घेऊन मैदानात उतरणार आहे, तर काँग्रेस देशभरातील प्रत्येक बूथवर कार्यकर्त्यांची फील्डिंग लावणार आहे.भाजपाच्या या नितीचे नाव जरी ‘टी-२०’ असले तरी क्रिकेटमधील सामन्याहून त्याचे स्वरूप वेगळे असेल. त्यात पक्षाच्या प्रत्येक कार्यकर्त्यास चहापानासाठी किमान २० घरांना भेट देऊन नरेंद्र मोदी सरकारची भरीव कामगिरी मतदारांच्या मनावर बिंबविण्याचे लक्ष्य देण्यात येणार आहे.पक्षाच्या एका वरिष्ठ नेत्याने सांगितले की, अलिकडेच राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत पक्षाची निवडणूक व्यूहरचना ठरविण्यात आली. त्यात पक्ष कार्यकर्त्यांनी प्रत्येक घरापर्यंत पोहोचणे, हा सर्वात महत्वाचा भाग असेल. त्यासाठी ‘हर बूथ, दस यूथ’ असे सूत्र ठरविण्यात आले आहे. बूथ पातळीवरील कार्यकर्त्यांखेरीज पक्षाचे सर्व आमदार व खासदारही सरकारची यशोगाथा तळागळापर्यंत पोहोचविण्यात सक्रियतेने सहभागी होतील.येत्या काही महिन्यांत होणाऱ्या चार राज्य विधानसभांच्या व त्यानंतर पुढील वर्षी होणारी लोकसभेची सार्वत्रिक निवडणूक डोळ््यापुढे ठेवून काँग्रेसने देशभरात एक कोटी ‘बूथ सहाय्यक’ नेमून प्रत्येक मतदार कुटुंबाशी संपर्क साधण्याची महत्वाकांक्षी योजना आखली आहे.६ सप्टेंबर रोजी पक्षाचे सरचिटणीस अशोक गेहलोत व खजिनदार अहमद पटेल यांनी सर्व प्रदेश काँग्रेस प्रमुखांची दिल्लीत बैठक घेतली त्यावेळी ही योजना ठरली. त्यावेळी पक्षाध्यक्ष राहुल गांधी मानसरोवरच्या यात्रेला गेले होते. तेथून परत आल्यावर गांधी यांनी यास मंजुरी दिल्यानंतर गेहलोत यांनी सर्व प्रदेश पक्षांना १३ सप्टेंबर रोजी पत्र पाठवून हा निर्णय कळविला आहे.भाजपा काय करणार?जास्तीत जास्त लोकांना ‘नरेंद्र मोदी अ‍ॅप’शी जोडून घेण्यात येईल. प्रत्येक बूथवर किमान १०० नव्या लोकांना या ‘अ‍ॅप’शी जोडण्याचे उद्दिष्ट देण्यात आले आहे.कार्यकर्त्यांना अधिक प्रभावी जनसंपर्क करता यावा यासाठी‘नरेंद्र मोदी अ‍ॅप’मध्ये एक नवा विभाग जोडण्यात येईल. यात प्रत्येक कार्यकर्त्यास त्याला नेमून दिलेले नेमके काम तर कळेलच त्याखेरीज आकर्षक ग्राफिक व व्हिडिओ क्लिपद्वारे उपलब्ध करून दिली जाईल.‘घर घर दस्तक’ नावाची मोहीम निवडणुकीचा प्रत्यक्ष प्रचार सुरु होण्याच्या आधीपासून हाती घेतली जाईल. यासाठी प्रत्येकबूथवर दोन डझन कार्यकर्त्यांची टोळी नेमली जाईल.काँग्रेस काय करणार?पक्षाच्या ब्लॉक व जिल्हा शाखांना मदत करण्यासाठी प्रदेश पक्षांनी प्रत्येक बूथसाठी किमान १० सहाय्यक नेमावेत, असे त्यांना कळविण्यात आले आहे.पक्षाचे राष्ट्रीय संघटन सचिव जे. डी. सलीम यांनी सांगितले की, सुमारे एक लाख बूथ असतात. प्रत्येक बूथसाठी किमान दहा याप्रमाणे एकूण एक कोटी बूथ सहाय्यक नेमण्याचे पक्षाचे उद्दिष्ट आहे. प्रत्येक बूथ सहाय्यकावर त्या भागातील किमान १०-१२ मतदार कुटुंबांशी संपर्क साधण्याची जबाबदारी असेल.बूथ सहाय्यक नेमण्याचे हे काम राज्य विधानसभा निवडणुकांपूर्वी म्हणजे नोव्हेंबर-डिसेंबरपर्यंत पूर्ण व्हावे, अशी अपेक्षा असल्याचेही सलीम म्हणाले.

टॅग्स :BJPभाजपाcongressकाँग्रेसLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९