शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

अर्ज भरताना भाजप करणार शक्तिप्रदर्शन; मुख्यमंत्रिपदाच्या दावेदारांसाठी असेल दिग्गजांची उपस्थिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 19, 2023 05:44 IST

पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांमध्ये भाजपने कोणत्याही राज्यात मुख्यमंत्रिपदाच्या दावेदारीसाठी कोणत्याही नेत्याचे नाव घोषित न करण्याचा धोरणात्मक निर्णय घेतला आहे

संजय शर्मालोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : मध्य प्रदेश व राजस्थानमध्ये भाजपच्या मुख्यमंत्रिपदाच्या दावेदारांच्या उमेदवारांचा अर्ज भरतेवेळी भाजपने पक्षाचे ज्येष्ठ केंद्रीय मंत्री व नेत्यांना पाठवण्याचा निर्णय घेतला आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह, नितीन गडकरी व भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा हे मुख्यमंत्रिपदाच्या दावेदारांच्या नामांकनावेळी सहभागी होणार आहेत.

पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांमध्ये भाजपने कोणत्याही राज्यात मुख्यमंत्रिपदाच्या दावेदारीसाठी कोणत्याही नेत्याचे नाव घोषित न करण्याचा धोरणात्मक निर्णय घेतला आहे; पंतप्रधान नरेंद्र माेदी यांच्या नेतृत्वावरच निवडणूक लढविली जात आहे. परंतु एखाद्या नेत्याची उमेदवारी दाखल करण्याच्या वेळी कोणते नेते जात आहेत, यावरून त्या राज्यांच्या मुख्यमंत्रिपदाच्या दावेदारांचे संकेत मिळत आहेत. छत्तीसगडमध्ये माजी मुख्यमंत्री रमण सिंह यांची उमेदवारी दाखल करतेवेळी स्वत: केंद्रीय गृहमंत्री अमित शाह राजनांदगाव येथे जाणार आहेत.

वसुंधरा राजे यांना निवडणूक प्रचार मोहीम समितीचे अध्यक्ष करणार नाहीत. राजस्थानबाबत भाजपमध्ये वाद आताही वाढत आहे. निवडणुकीच्या तारखांची घोषणा आणि उमेदवारांची घोषणा झाल्यानंतर तसेही निवडणूक प्रचार मोहीम समितीचे काम संपते. त्यामुळे आता सूत्रांचे म्हणणे आहे की, भाजप राजस्थानमध्ये आता कोणतीही निवडणूक प्रचार मोहीम समिती गठित करणार नाही. यापूर्वी या समितीचे अध्यक्ष करण्याची मागणी वसुंधरा राजे यांनी केली होती.

शाह आणि नड्डा यांची उपस्थितीजोधपूर येथून केंद्रीय मंत्री गजेंद्र सिंह शेखावत निवडणूक लढवू शकतात.  त्यांनी अर्ज दाखल करतेवेळी अमित शाह जातील. खा. दिया कुमारी अर्ज दाखल करताना पक्षाध्यक्ष जे. पी. नड्डा जाऊ शकतात. 

येथे जाणार नितीन गडकरी, राजनाथ सिंह   nमध्य प्रदेशात मुख्यमंत्रिपदाच्या अनेक दावेदारांपैकी शिवराज सिंह चौहान हे बुधनी येथून व इंदूर - एकमधून कैलाश विजयवर्गीय उमेदवारी दाखल करताना अमित शाह उपस्थित राहू शकतात.nकेंद्रीय मंत्री नितीन गडकरी २५ ऑक्टोबर रोजी केंद्रीय मंत्री प्रल्हाद सिंह पटेल यांचा उमेदवारी अर्ज दाखल करताना नरसिंहपूर येथे जातील.nकेंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंह हे केंद्रीय मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांचा दिमनी येथून उमेदवारी अर्ज दाखल करताना २४ किंवा २५ रोजी मुरैना येथे जातील. 

टॅग्स :Rajasthanराजस्थानBJPभाजपा